Breaking News LIVE | पक्ष वाढवूया, कोरोना नको; मुख्यमंत्र्यांचं राजकीय नेतेमंडळींना आवाहन

Breaking News LIVE Updates, 21 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Feb 2021 09:15 PM
पालघर जिल्ह्यात कोरोना बाबतचे नियम कठोर करण्यात आले असून आजपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ ,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे ,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ किरण महाजन,तहसीलदार सुनील शिंदे,यांच्या विशेष पथकाने आज रात्री पासूनच कारवाईला सुरुवात केली असून मंगल कार्यालय,रिसॉर्ट ,लग्न समारंभाच्या ठिकाणी धाडसत्र सुरू केल असून पालघर मधील जलदेवी रिसॉर्टवर पहिली धाड टाकली असून येथे सुरू असलेल्या लग्न समारंभात कारवाई केली आहे. या कारवाईत कोरोना नियम न पाळणार्याअ रिसॉर्ट मालकासह वर आणि वर पिता यांना ताब्यात घेतले असून सातपाटी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणेंच्या सतरा साथीदारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली आहे. याशिवाय साडे चार कोटींची अकरा आलिशान वाहनं जप्त करण्यात आली आहेत. मात्र अद्याप गजा मारणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी चार पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. शिरगाव पोलीस चौकीत त्याच्यासह साथीदारांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून विनापरवाना प्रवास करणे, फटाके फोडणे, आरडाओरडा करणे आणि या सर्वांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.
कार्यालयीन वेळांची विभागणी करा, शक्य असेल तिथं वर्क फ्रॉम होम सुरु ठेवा असं आवाहन मुख्यमंत्र्यंनी केलं आहे.
मी जबाबदार! ही एक नवी मोहिम राबवूया. घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, कार्यालयीन वेळा बदलणं या साऱ्याचा यात समावेश.
शासकीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं सुरु करण्याचं आवाहन. राजकीय कार्यक्रम, मोर्चे, गर्दी करणारी आंदोलनं यांच्यावर उद्यापासून बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आजच्या दिवसात जवळपास 7 हजार कोरोना रुग्ण सापडले. एका आठवड्यात मुंबई- पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आजच्या दिवसात जवळपास 7 हजार कोरोना रुग्ण सापडले. एका आठवड्यात मुंबई- पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना योद्धे नाही झालात, तर कोरोनाचे दूत तरी होऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्थचक्राला गती देताना कोरोना पुन्हा फोफावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाविरोधातील लढाईत मास्क हिच आपली ढाल, लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिर्वाय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय असेल अथवा नसेलही. पण, संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळणं हा एक महत्त्वाचा उपाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना वाढतोय असं म्हणत राज्यातील परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांनी वेधलं लक्ष
महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध लढतोय, आतापर्यंत 9 लाख नागरिकांना लस देण्यात आली. येत्या काळात आणखी एक-दोन कंपन्या लस उपलब्ध करुन देणार, त्यानंतर जनतेसाठी कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करणार- उद्धव ठाकरे
घरामध्ये बंद करुन ठेवणं कुणालाही आवडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अकोला जिल्ह्यातील अकोला महापालिका क्षेत्र, अकोट आणि मुर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात 23 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजतापासून कडक लॉकडाऊन. 1 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार लॉकडाऊन. सकाळी 8 ते 3 वाजेदरम्यान राहणार जीवनावश्यक सेवांची दुकानं सुरू.

कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज कोरोना बाधित 147 रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 1117. 24 तासात कोरोना बाधित 1 जणांचा मृत्यू. कोरोनामुळे 1189 जणांचा मृत्यू. कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रात कोरोना बाधित 61983 रुग्ण संख्या. केडीएमसी क्षेत्रात 59,6 77 रुग्णांनी केली कोरोनावर मात.
नाशिकमध्ये उद्यापासून रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रशासनाचा निर्णय. छगन भुजबळ यांच्याकडून पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती.
अमरावतीत उद्यापासून लॉकडाऊन होणार. अमरावती शहर आणि अचलपूरमध्ये लॉकडाऊन राहणार. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती. उद्या रात्री 8 पासून सात दिवस लॉकडाऊन राहणार.
लातूरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ट्विट करत दिली याबाबतची माहिती. अनेक सोशल मीडिया ग्रुपवर लातूरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. मी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो की, लातूरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. अशा प्रकारचं वृत्त पूर्णपणे खोटं असून, नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
गोंदियाच्या हलबीटोला गावातील अशोक गिरेपुंजे यांच्या शेतात सुरु असलेल्या बनावट विदेशी दारुच्या अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. 6 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त. तर पाच आरोपीना अटक.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी गावात आज पुन्हा 31 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून तीन दिवसात कोरोनाची संख्या 54 वर गेलीय,210 घर असलेले हे गाव विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून ,येथे महानुभाव पंथीयांचे मोठे तीर्थक्षेत्र आहे, खबरदारीचा उपाय म्हणून गाव बंद करण्यात आले असून गावातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलीय.
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश पारीत. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना ह्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील. धार्मिक स्थळे ही एका वेळी दहा व्यक्तीपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सोबतच अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचे आदेश पारीत.
मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथमच 'बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील बिबट्याला रेडिओ कॉलर लावण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ही प्रक्रिया उद्यानात पार पडली. यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि 'वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया'चे वन्यजीव संशोधक उपस्थित होते. मुंबईतील मानव-बिबट्या सहसंबधाचा अभ्यास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेडिओ कॉलर लावलेला बिबट्या मादी असून तिचे नामकरण 'सावित्री' असे करण्यात आले आहे.
बुलडाणा : प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयाकडून डिस्चार्ज, शेगाव येथील साईबाई मोटे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, प्रसुतींनंतर कोरोनाबाधित महिलेला ठेवल सामान्य रुग्णाच्या कक्षात.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय, रात्री 11 ते पहाटे सहा या काळात पुन्हा संचारबंदी..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता
पुणे-

कोरोना नियंत्रण आढावा बैठक,

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना,

हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन,

प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी,

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण,

खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक,

संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण,

नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन,

पालकमंत्री अजित पवारांचे बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता.
अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा 1055 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 28,815 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे.
वर्धा -वर्धा जिल्ह्यात संचारबंदीमुळे प्रवाशी वाहतूक सेवा बंद ,

प्रवाशी सेवा बंद असल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना त्रास ,

गावी कसे जायचे असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे, काही विद्यार्थी, प्रवाशी सकाळी ट्रेनने गावी जाण्यासाठी वर्ध्यात आले,

पण बस बंद असल्याने त्यांना खासगी वाहनांचा पर्याय शोधावा लागत आहे
भंडारा :- भंडारा तालुक्यातील मुजबी येथील सारडा मेटल कंपनीच्या परीसरात विहीर खोदकाम करत असताना विहिरीची माती खचली, एका मजुराचा दबून मृत्यू, अजूनही मृतदेह हाती नाही, खोदकाम सुरुच
सातारा : सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पुसेगावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील घटना ,

सर्व विद्यार्थी रूग्णालयात,
सेवागिरी शाळा केली बंद,
सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा तपासणी करणार,
सर्व विद्यार्थांचे पालक भयभीत
पुणे - उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक सुरू आहे.
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित.
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश
देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमारही उपस्थित
जालना जिल्ह्यातील वरुडी फाट्यावर औरंगाबादवरुन जालन्याकडे जाणाऱ्य खाजगी ट्रॅव्हलला आग लागली. मध्यरात्री 12 च्या सुमारास चालत्या गाडीत ही आग लागली. या आगीत ट्रॅव्हल जळून खाक झाली. दरम्यान गाडीत बसलेल्या प्रवाशांना आणि चालकाला गाडीतून धूर निघत असल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने धावाधाव झाली आणि गाडीत प्रवास करत असलेले चार प्रवासी खाली उतरले उतरले. या नंतर वाऱ्याच्या झोताने आगीने उग्र रुप धारण केले, ज्यात ही ट्रॅव्हल पूर्ण पणे जळाली. दरम्यान आगीचे कारण स्पष्ट झाले नसून यात कोणतीही जीवत हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पार्श्वभूमी

1. नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अमरावतीनं मुंबईलाही मागे टाकलं, २४ तासांत अमरावतीत १ हजार ५५ नव्या रुग्णांची नोंद


 


2. मुंबईत पुन्हा डोकं वर काढणाऱ्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी पालिकेनं कंबर कसली, अनेक बार आणि पबवर कारवाई, १ हजाराहून अधिक इमारती सील


 


3. पुण्यात लॉकडाऊन लागू झाल्याच्या खोट्या बातम्यांचा व्हीडिओ व्हायरल, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन


 


4. कोरोनाच्या संकटात कार्यालयीन वेळांबाबत धोरण आखण्याची गरज, नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना आवाहन,


 


5. चारित्र्यावरचा संशयाचा डाग पुसण्यासाठी पत्नीला उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढण्यास सांगितलं, व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशकात गुन्हा दाखल


 


6.बोचऱ्या थंडीपासून सैनिकांचं संरक्षण करण्यासाठी रँचोकडून खास तंबूची निर्मिती, सोनम वांगचुक यांच्या अविष्कारची सर्वत्र चर्चा


 


7. हिमप्रलयानंतर तापमान घसरल्यानं अमेरिकेवर मोठं संकट, दीड कोडी जनतेवर बर्फ वितळून पाणी पिण्याची नामुष्की, इलेक्ट्रिसिटी ग्रीडही ठप्प


 


8. सांगली महापालिकेतील सत्ताकारण! महापौर-उपमहापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.