(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE | भारतीय वंशाचे मेक्सिकोचे कृषीतज्ज्ञ आणि 'वर्ल्ड फूड प्राईज'चे विजेते डॉ.संजय राजाराम यांचं निधन
Breaking News LIVE Updates, 18 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता काही नवीन राहिलेला नाही. असाच वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त आहे, विधानसभा अध्यक्षपदाचं. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्या पदाचा कार्यभार सध्या नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. 1 मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी राज्यपालांनी थेट राज्य सरकारला थेट पत्र लिहिले आणि पत्रातून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार ही विचारणा केली आहे.
मंत्री शिवसेनेचा, पाठीशी राष्ट्रवादी; अजित पवार आणि नवाब मलिकांकडून संजय राठोड यांची पाठराखण
पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. पण राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मीडियावर खापर फोडत राठोड यांचा बचाव केला. पूजा चव्हाण प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या पाठराखणीने शिवसेना मंत्र्यांची अडचण झालीय कारण एकीकडे राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राठोड यांची पाठराखण केली.
राज्यात 4787 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक वाढ
राज्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आज राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आज 3853 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत एकूण 19 लाख 85 हजार 261 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.62 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 704 जणांना होमक्वॉरन्टीन असून 1664 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीनमध्ये आहेत.