Breaking News LIVE : सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार, प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 21 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
इंजेक्शनशिवाय दिल्या जाणाऱ्या 'ZyCoV-D' लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्राची मंजुरी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे. झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिला लसची चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.
लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर टीम इंडिया इतिहास रचणार? जाणून घ्या मागील रेकॉर्ड्स
टीम इंडिया आणि इंग्लड यांच्या तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. 19 वर्षांनी लीड्समधील हेडिंग्ले मैदानात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाला दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर इंग्लंडनं 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला एक सामना ड्रॉ राहिला आहे.
लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये इंग्लंडनं विजय मिळवला होता. परंतु, 1986 आणि 2002 मध्ये भारतीय संघानं या मेदानावर फक्त विजयच मिळवला नाही, तर पहिल्या डावात 279 धावांनी आणि दुसऱ्या डावात 46 धावांच्या फरकानं इंग्लंडचा पराभव केला होता. अशातच आता पुन्हा एकदा टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे.
राज्यातील शाळा सुरू झालेल्या ठिकाणचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर, वाचा.. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उपस्थिती
आतापर्यत इयत्ता 8 ते 12 वी शाळा सुरू केल्यानंतर प्राप्त माहितीचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये 18 ऑगस्ट या एका दिवशी माहिती गोळा करून हा अहवाल तयार केलेला आहे. यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गात शिकणारे या दिवशी राज्यातील 15,12,404 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले आहेत. तर राज्यभरात इयत्ता आठवी ते बारावी वर्गाच्या आतापर्यत 17,701 शाळा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गाचे एकूण विद्यार्थी 1,03,07,457 संख्या आहे. त्यातील फक्त 14.67 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित दर्शवली आहे. तर एकूण शाळेच्या संख्या लक्षात घेता 38.18 टक्के शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती विभागात 2,282 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात यवतमाळ जिल्ह्यात 779 शाळा सुरू झाल्या आहेत. तर शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही लातूर विभागाची सर्वाधिक असून या विभागात 56.58 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांची माहिती शिक्षण विभागाला आणखी प्राप्त होणे बाकी आहे.
यवतमाळ : महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आमदार संजय राठोड यांना पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाकडून क्लीन चिट
यवतमाळ : महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी आमदार संजय राठोड यांना पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाकडून क्लीन चिट
सांगलीतील जेष्ठ पत्रकार,प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे निधन
सांगलीतील जेष्ठ पत्रकार,प्रख्यात निवेदक,उत्कृष्ट रंगकर्मी, अरुण नाईक यांचे सांगलीतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबियांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायत समोर केले अंत्यसंस्कार, या प्रकरणात अट्रोसिटीसह तीन गुन्हे दाखल
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबियांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायत समोर केले अंत्यसंस्कार, या प्रकरणात अट्रोसिटीसह तीन गुन्हे दाखल
महाराष्ट्रात आज देखील चांगल्या पावसाचा अंदाज, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पाऊस
महाराष्ट्रात आज देखील चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सर्वदूर पाऊस, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच पावसाची हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि नाशिकला यलो अलर्ट, नाशकातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे.पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात 23 तारखेपासून पावसात घट होणार आहे. मात्र रिपरिप असणार त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, घाट माथ्यावर पावसाची रिपरिप असण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना झटका, ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला
नवी मुंबई - मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना झटका. ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला, 'आपल्या जीवाला धोका आहे. काळे यांचे सहकारी गुंड प्रवृत्तीचे आहेत. मला धमकावण्याचा प्रयत्न झाला, मुलाची साक्ष अजून पोलिसांनी नोंदवली नाही' या मुद्द्यांवर जामीन नाकारावा अशी संजीवनी काळे यांची कोर्टात साक्ष, गजानन काळे यांना जामीन दिल्यास जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता.. पोलीसांकडून कोर्टात स्पष्टीकरण .. वरील मुद्दे लक्षात घेवून ठाणे सेशन कोर्टाकडून गजानन काळे यांना जामीन देण्यास नकार