Breaking News LIVE : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट
Breaking News LIVE Updates, 2 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, महाविकास आघाडीमधील कुरबुरीची चर्चा सुरू असताना महत्वाची भेट, 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत-राहुल गांधींमध्ये सव्वा तास बैठक, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक
महाविकासआघाडी मधल्या कुरबुरीची चर्चा सुरू असताना महत्वाची भेट घेतली. 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत-राहुल गांधी मध्ये सव्वा तास बैठक सुरू होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक सुरू आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेने काढली मार्गदर्शक नियमावली
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा...
- सार्वजनिक मंडळात चार फूट तर घरात दोन फूट गणेश मूर्ती बसवण्यास परवानगी...
- श्रीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला पूर्णपणे बंदी...
- शासनाने दिलेल्या मर्यादेतच गणेश मंडप उभा करावे...
- गणेशोत्सवात शासन कोरोना प्रतिबंधित नियमात कुठेही शिथिलता देणार नाही...
- सार्वजनिक मंडळानी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी
राज्य सरकारची नवी नियमावली जारी, 25 जिल्ह्यांना दिलासा, सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार, 4 ऑगस्टपासून नियम लागू
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, उद्या दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार
संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट, महाराष्ट्रातल्या महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा, राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा, शिवसेनेचे संसदीय पक्षनेते संजय राऊत, लोकसभेतले गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह इतर खासदारांची उपस्थिती, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे सुनील तटकरे फौजिया खान यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर शिवसेनेच्या जि. प. सदस्यांचे ठिय्या आंदोलन, स्वनिधी वाटपात झालेली अनियमितता व आयुक्तांनी चौकशी अहवाल पाठविण्यास सांगूनही होणारी चालढकल यामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन
Breaking News LIVE : मुंबई विमानतळावर अदानींचा नामफलक शिवसैनिकांनी तोडला, अदानी एअरपोर्टच्या फलकाला शिवसेनेचा विरोध
Breaking News LIVE : पॉर्नोग्राफी केसमध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्राची हायकोर्टात याचिका, राज्य सरकारचा या याचिकेला जोरदार विरोध करत युक्तिवाद सुरू https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-2-2021-maharashtra-political-news-rain-news-mumbai-997020
पूरपरिस्थीतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची माझी तयारी आहे. तुमची त्यासाठी तयारी आहे का ? पुनर्वसन करावे लागेल. त्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील. किती दिवस विस्थापित म्हणून जगणार. मला खोटे बोलता येत नाही. काहीजण फक्त पॅकेज जाहीर करतात. मला खरच मदत करायची आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील पूरग्रस्तांशी संवाद साधताना सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीतील भिलवडीत दाखल झाले असून नुकसानीचा आढावा घेतला. अवघ्या 5 ते 7 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आटोपला. यावेळी बोलताना या संकटातून मार्ग काढणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
नाशिक महापालिकेच्या ठेकेदाराने झाड कापल्याने फांद्यावरील बगळ्याची घरटी खाली रस्त्यांवर कोसळून 15 हून अधिक बगळ्यांच्या पिल्लाचा मृत्यू झाला तर अनेक बगळे जखमी झालेत. नाशिकच्या गंगापूर रोडवरील डिके नगरमधील काल दुपारची घटना आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून खाया प्रजातीच्या झाडावर कुऱ्हाड चालवली गेली. पक्षीप्रेमींसह पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. आता महापालिका आणि पोलिस विभाग क़ाय कारवाई करते याकडे लक्ष आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली पूरस्थितीचा आढावा घेणार, कोल्हापूर विमानतळावर दाखल, कोल्हापूर विमानतळावरून सांगलीकडे रवाना होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरा. मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर पोहोचले असून कृषी, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांचं स्वागत केलं.
सांगली : कृष्णा-वारणा काठच्या महापुराचा शेती बरोबरच दूध उत्पादनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. मौजे डीग्रज मधील कामधेनु दूध उत्पाद सहकारी सोसायटीचे दूध उत्पादन साडेतीन हजार लिटरने घटले, साडेचार हजार लिटर वरून पंधराशे लिटरवर दुधाचे उत्पादन आले. जनावरे पाण्यात राहिल्याने , जनावराच्या स्थळातरणामुळे आणि चाऱ्याअभावी दूध उत्पादन घटले. आणखी महिनाभर जनावराना व्यवस्थित चारा मिळणार नसल्याने महिनाभर दूध उत्पादकासमोर आणि दूध सोसायटीसमोर मोठ्या अडचणी वाढल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर असून तिथल्या पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. ते आता कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले असून सांगलीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पालिका आयुक्त कादंबरी बलकवडे हे उपस्थित आहेत.
मुंबईतल्या स्फोटात अतिरेक्यांनी शिवसेना भवनात बाँम्ब फोडायचाही प्रयत्न केला होता. ज्वलंत राष्ट्रवादाचं प्रतीक असलेली ही इमारत आहे. मराठी अस्मिता माहिती असणारे लोक असं विधान कधीच करू शकणार नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांच्यावर पटलवार केला. मूळचे भाजपचे लोक कधीच अशी विधानं करणार नाहीत. पण काही बाटगे आपली निष्ठा दाखवण्यासाठी अशी विधानं करतात. ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ले करायचा प्रयत्न केला ते राजकारणातून नंतर गायब झाले.हा आजवरचा इतिहास आहे असंही ते म्हणाले.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा काम करत असताना सातारा जिल्ह्यातील मायणी अनफळे येथे न्यायालयाच्या बंदीचा आदेश धुडकावून बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने जुलै 2011 मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, 1960 चा आधार घेऊन बैलांच्या शर्यतीवर बंदी आणली होती.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे
मुंबईच्या दादर भाजी मार्केट मध्ये आज सकाळी भाजी घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकार तिसरी लाटेला रोखण्याची तयारी सुरू केली आहे, राज्य सरकार लोकांना सातत्याने आव्हान करत आहे की कोरोना नियमांचे पालन करा. मात्र दादर भाजी मार्केटमध्ये लोकांनी आज सकाळी तुफान गर्दी केली आणि या गर्दीमध्ये काही ग्राहक आणि दुकानदार बिना मास्क फिरताना दिसत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा मार्केटमध्ये लोकांनी फज्जा उडवलेला पाहायला मिळाला.
मुंबईत गोरेगाव पूर्व मध्ये नेस्को सेंटर लसीकरण केंद्राबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांनी रात्री दहा ते अकराच्या सुमारास रांगा लावून गर्दी केली आहे. सकाळी नेस्को सेंटर गेट बाहेर नागरिकांचा 200 मीटर लांब रांगा लागलेला पाहायला मिळत आहे. मुंबईत लसीचा साठा पर्याप्त मात्रा मध्ये नसल्यामुळे गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये आज फक्त 70 लोकांना लस मिळणार आहे. मात्र रात्र पासून मोठा संख्यामध्ये लोकांनी रांगा लावले आहे. सर्वांना अपेक्षा होती की आज त्यांना लस मिळणार आहे, मात्र लसीचे स्टॉक कमी असल्यामुळे रांगेत असलेले काही लोकांना आज परत घरी जावं लागणार आहे.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवार, 2 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरूजी यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1980 साली ते आमदार होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3 नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. अणदूर परिसरात त्यांनी एकूण 28 शाळा सुरु केल्यात. तुळजाभवानी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होते.
पार्श्वभूमी
"मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन महत्वकांक्षी प्रकल्प, अभिमान वाटेल अशा पद्धतीने तयार होईल. त्यातील रहिवाशांचं व्यवस्थितरित्या पुनर्वसन करु. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पातून रहिवाशांच्या चांगल्या घराची स्वप्नं, आशा पूर्ण होणार आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रत्येक चाळवासियाला इथं रहावंस वाटेल, अशा पद्धतीनं वरळी बीडीडी चाळीचं पुनर्वसन होईल.", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं कौतुक केलं. अजित पवार त्यांच्या इतर कामामुळे कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाहीत. मात्र त्यांनी विडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या LSHTM सोबत करार
अश्वगंधा या वनस्तपीपासून तयार केलेल्या औषधामुळे कोविड रुग्णांना फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आयुष मंत्रालयाने यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत (LSHTM) 'अश्वगंधा'वर अभ्यास करण्यासाठी करार केला आहे.
मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि LSHTM ने अलीकडेच यूकेच्या तीन शहरांमध्ये 2,000 लोकांवर 'अश्वगंधा' च्या क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
'भारतीय हिवाळी चेरी'
'अश्वगंधा' (Withania somnifera), ज्याला सामान्यतः 'इंडियन विंटर चेरी' म्हणून ओळखले जाते, ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती आहे, जी ऊर्जा वाढवते, तणाव कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अश्वगंधा सहज उपलब्ध होणारी असून ओव्हर-द-काउंटर पोषण पूरक आहे. लाँग कोविडमध्ये 'अश्वगंधा' चे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. औषधाची चाचणी यशस्वी झाल्यास मोठं यश मिळणार आहे. यामुळे भारताच्या पारंपारिक औषधी प्रणालीला वैज्ञानिक वैधता मिळू शकेल.
वेदिकाची मृत्यूची झुंज अपयशी, 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही वेदिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -