Breaking News LIVE : कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा एक कोटीचा निधी
Breaking News LIVE Updates, 17 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
पंढरपूर, बेळगावमध्ये कोरोना संकटातच पोटनिवडणुकांसाठी आज मतदान
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी हे मतदान होत असून प्रमुख लढत भाजप उमेदवार समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यातच होत आहे. राज्यात दर दिवशी कोरोनाचं संकट अधिक गडद होत असतानाच पंढरपूर आणि बेळगाव या भागांमध्ये पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांत आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर
राज्यातच नाही तर देशात सध्या दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वेगाने वाढत आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचा एक फॅक्टर समोर आलाय तो म्हणजे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात रुग्ण यायला नको. असे असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत.
मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला यात पहिल्यांदा रुग्ण आढळल्यानंतर थेट रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आणि यात लक्षण असलेले आणि लक्षण नसलेले अशी वर्गवारी करण्यात आली. त्यातही रुग्णालय फुल्ल झाल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय समोर आला. मात्र यासाठी अनेक नियम घालून देण्यात आले होते. परंतु या नियमांचे दुसऱ्या टप्प्यात मात्र पालन होत नाही.
ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना
राज्यात दिवसेंदिवस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान या परिस्थितीत या सर्वांची माल वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. राज्यांतर्गत तपासणी नाक्यांवर वाहतूक, परिवहन आणि पोलिस प्रशासनाकडून मालवाहतूक वाहनांच्या चालकांची आणि मालकांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या बाल मल्कित सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे.
कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचा एक कोटीचा निधी
कोविड रुग्णालयासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कालच वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदारांना स्थानिक विकास निधीतले 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना भेटून एक कोटीचा निधी वळता करण्याचे पत्र दिले. विशेष म्हणजे चंद्रपूर मनपा ही भाजपच्या ताब्यात आहे आणि जोरगेवार हे भाजपविरोधात निवडणूक लढवून आमदार झाले आहे.
भंडारा शहरातील सर्व किराणा दुकाने 17 ते 20 एप्रिलपर्यंत बंद
भंडारा जिल्ह्यात विशेषत: भंडारा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवता यावे आणि किराणा व्यावसायिक आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी भंडारा किराणा अँड जनरल असोसिएशनची महत्वाची बैठक शुक्रवारी पार पडली आहे, भंडारा किराणा अँड जनरल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज संघानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने 17 ते 20 एप्रिलपर्यंत भंडारा शहरातील सर्व किराणा दुकाने बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
आशेचा किरण! औष्णिक उर्जा प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती शक्य
ऑक्सिजन मिळवण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार, उर्जामंत्री नितीन राऊत यांचा वृत्ताला दिलासा. औष्णिक उर्जा प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती शक्य. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची एबीपी माझाला माहिती.
सोलापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सोलापूर शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याची कारवाई. जवळपास 70 ते 80 लोकांना ताब्यात घेऊन केली दंडात्मक कारवाई. सकाळी मॉर्निंग वॉक आणि नंतर इतर कारणांनी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कारवाई
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद. बारामतीत चौघांना अटक. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटलीत पॅरासिटामोलचं औषध भरत असल्याची धक्कादायक बाब उघड