Breaking News LIVE : पुण्यात आज दिवसभरात 7,888 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 14 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू, पुढचे 15 दिवस संचारबंदी
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावताना जनतेच्या तोंडाला पाने पुसली : चंद्रकांत पाटील
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलीय या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांता पाटील यांनी केली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. असं ते म्हणाले.
परदेशात आपत्कालीन वापरात असलेल्या लसींना भारतात मंजुरी मिळणार
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारत परदेशात बनवलेल्या आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींच्या वापरास मान्यता देण्याची शक्यता आहे. लसीकरण गतिमान करण्यासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन अॅडमिनिस्टेशन फॉर कोविड 19 (NEGVAC) ने सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. परदेशात निर्माण झालेल्या विविध लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा लसी भारतात आयात केल्या पाहिजेत, असा प्रस्ताव NEGVAC केला, जो भारत सरकारने मान्य केला आहे.
NEGVAC च्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, USFDA, EMA, UK MHRA, PMDA, JAPAN यांनी आपत्कालीन मंजुरी दिलेल्या लसी आणि WHO च्या यादीत सामील असलेल्या लसींना भारतात आपत्कालीन वापरास मान्यता द्यावी. NEGVAC चा हा प्रस्ताव भारत सरकारने मान्य केला आहे.
पुण्यात आज दिवसभरात 7888 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
पुण्यात आज दिवसभरात 7888 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 94 बाधितांचा मृत्यू
#IPL2021 | बंगलोरचं हैदराबादसमोर 150 धावांचं लक्ष्य, ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळी
राज्यात आज नवीन 58,952 कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात आज नवीन 58,952 कोरोनाबाधितांची नोंद, तर 39,624 रुग्णांना डिस्चार्ज
अमरावती शहरात आणि जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू...
अमरावती शहरात आणि जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू...
बीड : गेवराई परिसरात गारपीट, फळबागांचे आणि आंब्याचे मोठे नुकसान
बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील संदीप पवार यांच्या शेतात असा गरांचा सडा पडला होता..यात त्यांच्या पेरूच्या बागेच आणि मिरचीच्या पिकाच मोठं नुकसान झालं आहे..
त्याच बरोबर या परिसरातील शेतकऱ्यांचं देखील मोठ नुकसान झालं आहे. काढणीला आलेले डाळिंब, टरबूज, खरबूज, भाजीपाला आणि पेरूच्या बागांना या गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या फळबाग शेतकऱ्यांचं या गारपिटीमुळे आता पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे