Breaking News LIVE : टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात, अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाटातील घटना
Breaking News LIVE Updates, 1 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांमध्ये भीतीदायक वाढ; मृतांचा आकडाही वाढला
कोरोना विषाणू साऱ्या विश्वात थैमान घालत असतानाच महाराष्ट्रावरही कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. ज्यामुळं नियंत्रणात येऊ पाहणारा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लादगला आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.
आजपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 10 रुपयांनी कपात; नवे दर आजपासून लागू
एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलेंडर्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि आता कमी करण्यात आलेली किंमत यात बरीत तफावत आहे. परंतु त्यातून थोडा का होईना दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या 2021-22 मध्ये लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा सर्व योजनांवरील व्याज दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका बसला आहे. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय.
टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात
टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात. रस्त्याच्या कडेला 20 फूट दरीत टेम्पो पलटी. अपघातात 1 ठार तर 17 जण जखमी. अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाटातील घटना. घोटीकडे जाणाऱ्या मार्गावर झाला संध्याकाळी अपघात. बांधकामावर काम करणाऱ्या मजूरांना घेऊन जात असताना अपघात घडल्याची माहिती. जखमींना घोटी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
आमदार निवासात सापडला कोरोना रुग्ण!
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सध्याची परिस्थिती नाजूक बनली आहे. म्हणून मंत्रालयात सध्या अभ्यंगताना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता मुंबईत असलेल्या आकाशवाणी या आमदार निवासांमध्येही अभ्यांगतांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे, तसे परिपत्रक विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी काढले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, म्हणून आकाशवाणी आणि विस्तारित आमदार निवासामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.
किल्ले रायगड येथील रोपवे 3 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान बंद राहणार
किल्ले रायगड येथील रोपवे 3 एप्रिल ते 18 एप्रिल या दरम्यान बंद राहणार. रोप वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार. रायगड रोपवे कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती.
दोन रिक्षा चालकात प्रवाशांवरुन वाद, एका रिक्षा चालकाकडून दुसऱ्याची हत्या
जिल्ह्यातील खामगाव शहरातील निर्मल चौकात आज सायंकाळी 6.30 वाजता दोन रिक्षा चालकात प्रवासी बसवण्याच्या वादातुन एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केल्याची घटना घडली. या वादामुळे निर्मल चौकात तणाव निर्माण झालाय.
किल्ले रायगड परिसरातील 21 गावातील पाणी प्रश्ना संदर्भात बैठक
किल्ले रायगड परिसरातील 21 गावातील पाणी प्रश्ना संदर्भात बैठक, नाना पाटेकर उपस्थित राहणार. पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न. जिल्हाधिकारी, संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार, शुक्रवार सकाळी 11 वाजता पाचाड येथे बैठक.