Breaking News LIVE : अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद
Breaking News LIVE Updates, 05 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
1. महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार, मिशन 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर
2. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे काही महत्वाचे निर्णय, जिम, सिनेमागृह, नाट्यगृह, गार्डन, मैदानं, प्रार्थनास्थळंही बंद, अत्यावश्यक सेवांना परवानगी, लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवासाला परवानगी
3. 'उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्योग जगताला आवाहन, कोरोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची राज ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, सहकार्याचं आवाहन
4. लॉकडाऊनबाबत जर काही निर्णय घेण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देण्यात येईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
5. मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर, मुंबईतील चार ठिकाणं कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत
6. महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद, शनिवारी राज्यात विक्रमी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून यंत्रणेचे अभिनंदन
7. नांदेडमध्ये RTPCR चाचणीसाठी रुग्णांकडून जास्तीची रक्कम घेणाऱ्या खाजगी लॅबवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, बुलडाण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचं प्रमाणही कमी
8. कोरोना काळात विकासकामांना कात्री तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी लावली का? राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर
9. बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारला कोरोनाची लागण, अभिनेते गोविंदा यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवालही कोरोनाबाधित
10. प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन, मुंबईतील कुलाबा येथील राहत्या घरी अखेरचा श्वास
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद राहणार
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद राहणार. पुण्यात आतापर्यंत संध्याकाळी सहा ते पहाटे सहा या कालावधीत नाईट कर्फ्यु होता. मात्र दिवसा सर्व दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी होती. मात्र राज्य सरकारने राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो पुण्यात देखील उद्यापासून लागू होणार आहे.
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद
अत्यावश्यक सुविधा वगळता पुण्यातील सर्व दुकानं देखील उद्यापासून बंद राहणार. पुण्यात आतापर्यंत संध्याकाळी सहा ते पहाटे सहा या कालावधीत नाईट कर्फ्यू होता. मात्र दिवसा सर्व दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी होती. मात्र राज्य सरकारने राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो पुण्यात देखील लागू होईल . व्यापारी महांघानेही उद्यापासून अत्यावश्यक सुविधा वगळून इतर दुकानं बंद राहतील असं म्हटलय.
रश्मी ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबईहून भंडारा येथे जाताना अपघातात कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू
मुंबईहून भंडारा येथे परत जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात कारागृहातील बंदीवानाचा मृत्यू झाला असून तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. नागपूर - अमरावती महामार्गावर कारंजा (घाडगे) लगत राजनी शिवारात दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मृताचे नाव श्रावण बावणे (65) असे आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पनवेल महापालिकेतील 15 नगरसेवक निलंबित, ॲानलाईन सभेऐवजी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहिल्याने महापौरांची कारवाई
पनवेल महापालिकेत आज मालमत्ता कराबाबत चर्चा करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. कोराचा संसर्ग वाढत असल्याने या सभेला महानगरपालिकेच्या नगरसेवकांना ॲानलाईन पद्धतीचा उपयोग करून हजर राहण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. मात्र महापौरांचा आदेश धुडकावत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीच्या 15 नगरसेवकांनी सभागृहात प्रत्यक्ष प्रवेश करत घोषणाबाजी करण्यास सुरवात केली होती. मालमत्ता करात सत्ताधारी भाजपाने मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याने पनवेलकरांना याचा भूर्दंड बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केलाय. या विरोधात आवाज उठवला असता ॲानलाईन आपल्याला बोलू देत नसल्याचा आरोप महापौरांवर करण्यात आलाय. त्यामुळे जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्षांनी सभागृहात उपस्थितीत लावली असल्याचे स्पष्टीकरण दिलंय. सभागृहात उपस्थितीत राहिलेले शेकाप, राष्ट्रवादीचे नगरसेवक बाहेर जात नसल्याने भाजपाच्या महापौर कविता चौतमल यांनी 15 नगरसेवकांचे निलंबन केले. यानंतर पोलीसांनी सभागृहात येत नगरसेवकांना बाहेर काढले .