Breaking News LIVE : दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Breaking News LIVE Updates, 03 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. राज्यात आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Pune Lockdown : पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आजपासून पुढील सात दिवस हा मिनी लॉकडाऊन असणार आहे. सात दिवस सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस, पीएमपीएमएलची बससेवा इत्यादी गोष्टी पूर्णपणे बंद असतील. कोरोना संकट कमी व्हावं या उद्देशाने हा मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनला लोकांचा प्रतिसाद देखील तितकच महत्वाचं आहे.
CoronaVirus | पालघर जिल्ह्यातील शाळा 5 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद
पालघर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच यापूर्वी विविध शाळांमध्ये आजाराचे झालेले संक्रमण लक्षात घेऊन, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जारी केले आहेत.
Maharashtra Coronavirus | 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्तींसाठी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करा
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस ही घरोघरी जाऊन द्यावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य सरकारसह, मुंबई महापालिका आणि केंद्र सरकारलाही प्रतिवादी केलेलं आहे. केंद्र सरकारनंदेखील ज्येष्ठ आणि अशा विशेष नागरिकांच्या बाबतीत घरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी देत धोरण निश्चित करावे, अशी या याचिकेत मागणी केलेली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घटना
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 5 जवान शहीद, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घटना
बुलढाणा सैलानी यात्रा अपडेट
जमावबंदी झुगारत यात्रा भरविल्या प्रकरणी एक हजार नागरिकांवर गुन्हा दाखल. तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या तक्रारी नंतर रायपुर पोलिसात गुन्हा दाखल. पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांची माहिती. आता पर्यन्त सहा जनाना घेतल ताब्यात.
बांगलादेशमध्ये सोमवारी 7 एप्रिलपासून सात दिवस लॉकडाऊन
बांगलादेशमध्ये सोमवारी 7 एप्रिलपासून सात दिवस लॉकडाऊन. देशात कोरोनाबाधितांचा वाढती संख्येमुळे सोमवारपासून सात दिवसांचे लॉकडाउनची घोषणा बांगलादेश सरकारने आज केली. यासंदर्भातील माहिती सत्ताधारी अवामी लीगचे अब्दुल कादिर यांनी शनिवारी माध्यमांना दिली.
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण अपडेट
IFS रँक दर्जाचे असणारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दिपाली चव्हाण केसमध्ये अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी केलेल्या अर्जावर अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होती.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या पूर्वी सुसाईट नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं पत्र त्यांनी श्रीनिवासा रेड्डी यांना लिहलं होतं. याप्रकरणात DFO विनोद शिवकुमार यांना अटक झालेली आहे.