Breaking News LIVE : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका डॉक्टरच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला
Breaking News LIVE Updates, 03 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
- जिंदगी, जान आणि मग काम, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, नव्या नियमावलीपूर्वी विविध क्षेत्रात मान्यवरांशी चर्चा
- मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटींसाठी महापालिकेची विशेष नियमावली, पाच पेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या 681 इमारती आणि 8000 मजले सील
- राज्यात नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 50,000 च्या उंबरठ्यावर, पुण्यात दहा हजाराहून अधिक, तर मुंबईत नऊ हजार नव्या रुग्णांची नोंद
- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली, अजूनही मुंबई लोकलला तुडुंब गर्दी
- मुंबईतील गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि चेंबूर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक
- कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नागपूरमधील होप रुग्णालयात नातेवाईकांचा धुडगुस, रिसेप्शन काऊंटर पेटवून देण्याचा प्रयत्न, नऊ नातेवाईक ताब्यात
- पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
- 60 लाख भारतीयांसह जगभरातल्या 53 कोटी फेसबुक युजर्सचा खासगी डेटा लीक, खुद्द फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गच्या फोन नंबरचाही समावेश
- छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षली हल्ल्यात पाच जवान शहीद तर बारा गंभीर जखमी, 21 जवान अजूनही बेपत्ताच, दोन नक्षलींना कंठस्नान
- राज्यातल्या प्रमुख नेत्यांचे दार ठोठावूनही उपासमारीची वेळ, लोककलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकरांनी माझा कट्ट्यावर व्यक्त केली खंत
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका डॉक्टरच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला
शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका संशयिताने डॉक्टर आत्माराम भगवान लोखंडे वय वर्षे 65 यांच्या घरात घुसून डॉक्टर आत्माराम लोखंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करत असताना लोखंडे यांच्या पत्नीने घराबाहेर येऊन आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. मात्र, या घटनेमागील कारण समजू शकलेले नाही. डॉक्टर लोखंडे यांच्या छातीवर आणि डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले डॉक्टर आत्माराम लोखंडे हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मोखाडा ब्राम्हणपाडा येथील अनंत मौळे यांना भाजपकडून पाच लाखांची मदत
पालघर येथे होळीच्या रात्री मोखाडा ब्राम्हणपाडा येथील अनंत मौळे याच्या घराला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता, त्यांनतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि भाजपकडून पाच लाखांची मदत जाहीर केली होती. आज दहीसरच्या आमदार मानिषताई चौधरी यांनी पाच लाखांचा धनादेश अनंत मौळे याच्या। स्वाधीन केला.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती पाहता काल मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, राज्यातील कोरोना स्थिती पाहता कडक निरबन्ध लावावे लागतील याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सरकार जे निर्णय घेतील त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली
मुरूम चोरीची फिर्याद दिल्याने बार्शीमध्ये फिर्यादीवर आरोपींकडून जीवघेणा हल्ला
मुरूम चोरीची फिर्याद दिल्याने बार्शीमध्ये फिर्यादीवर आरोपींकडून जीवघेणा हल्ला ,
बार्शी तालुक्यातील जवळगावमध्ये मुरुम चोरीची फिर्याद दिल्याने मुरुम माफियांनी हल्ला केल्याचा आरोप,
फिर्यादी विष्णू कापसे आणि त्यांचे भाऊ दिलीप कापसे यांच्यावर सात ते आठ जणांचा कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप,
हल्ल्यात फिर्यादी विष्णू कापसे जखमी, जखमी फिर्यादीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात केले दाखल ,
मुरुम चोरीबाबत कोर्टात फिर्याद का दाखल केली असे म्हणत हल्ला केल्याचा आरोप,