एक्स्प्लोर

BRC कडून 8 नवीन पिकांचे वाण विकसित, शेतकऱ्यांसाठी तांदूळ, तीळाच्या वाणांची निर्मिती

शेतीचा कायापालट करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने व्यावसायिक लागवडीसाठी आठ नवीन पिकांचे वाण विकसित केले आहेत.

Bhabha Atomic Research Centre : शेतीचा कायापालट करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी, पिकांची लवचिकता वाढवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने व्यावसायिक लागवडीसाठी आठ नवीन पिकांचे वाण विकसित केले आहेत. यात 5 तृणधान्ये आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे. BRC ने 70  वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 70 पीक जाती शेतकऱ्यांसाठी विकसित केल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कोणते वाण केले विकसीत?

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील क्षार जमिनीसाठी ‘ट्रॉम्बे कोकण खारा’ हे तांदळाचे वाण विकसित केले आहे. या वाणामुळे खाऱ्या मातीमध्ये भातशेती करणे शक्य होणार असून भाताचे उत्पादन 15 टक्क्यांनी वाढण्यासही मदत होणार आहे. रायपूरमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी ‘बौना लुचाई-सीटीएलएम’ आणि ‘संजीवनी’ हे तांदळाचे दोन वाण विकसित केले आहेत. राजस्थानच्या शुष्क परिस्थितीत चांगले उत्पादन मिळावे, यासाठी उष्णता सहन करणारे आणि बुरशीजन्य रोगांना प्रतिरोधक असलेली ‘ट्रॉम्बे जोधपूर गहू-153’ ही जात जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. ‘ट्रॉम्बे राज विजय गहू 155’ ही जात मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केली. बीएआरसीद्वारे गव्हाचे वाण विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न

देशांतर्गत उत्पादनातून 40 ते 45 टक्के तेलबियांची गरज भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी मोहरी, तीळ आणि भुईमुगाचे उच्च उत्पन्न देणारे सुधारित वाण बीएआरसीने विकसित केले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने गामा किरण विकिरण वापरून प्रथमच तीळाची ‘ट्रॉम्बे लातूर तीळ-10’ ही जात विकसित केली आहे. यातून सुमारे 20 टक्के अधिक उत्पन्न मिळणार आहे. राजस्थानसाठी जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने ‘ट्रॉम्बे जोधपूर मस्टर्ड 2’ ही सध्याच्या वाणांपेक्षा 14 टक्के अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात आले आहे. यात तेलाचे प्रमाण 40 टक्के आहे. रायपूरमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने ‘ट्रॉम्बे ग्राउंडनट 88’ हे भुईमुगाचे नवे वाण विकसित केले आहे. त्याला ‘छत्तीसगड ट्रॉम्बे मुंगफली’ असेही नाव दिले आहे. हे वाण छत्तीसगडमध्ये पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, 'या' पिकाची MSP वाढवली, शेतकऱ्यांना किती होणार फायदा

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget