ब्रम्हपूरीत देशातील सर्वाधिक 38.6° तापमानाची नोंद, विदर्भ तापला, IMD ने राज्यात कुठे काय दिलाय तापमानाचा अलर्ट?
सध्या राज्यात प्रचंड उष्णता वाढलीय. प्रचंड रखरख वाढली असून दुपारच्या प्रहरात उन्हात न जाण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात येतोय.

Maharashtra Weather Update: राज्यभरात उन्हाचा चटका वाढलाय. तापमानाचा पारा 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत केल्याने धग वाढली आहे.(Temperature) रविवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक तापला होता. ब्रह्मपुरीत 38.6°एवढ्या देशभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली . अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस एवढा पारा गेला. सोलापुरात 37.6 अंश तापमान होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन दिवस साधारण असेच तापमान राहणार आहे. त्यानंतर हळूहळू दोन ते चार अंशांनी तापमान घसरेल .कोकण आणि गोवा या दोन प्रदेशांमध्ये 5 तारखेपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागांना सांगितलं . (IMD Forecast)
हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना तीव्र तापमानाचे इशारे पुढील दोन दिवस दिले आहेत .उष्ण आणि दमट वातावरणाचे यलो अलर्ट या दोन जिल्ह्यांना आहेत .उर्वरित ठिकाणी उष्णतेचा पारा चढाच राहणार असून बहुतांश ठिकाणी शुष्क व कोरडे हवामान राहणार आहे . सध्या राज्यात प्रचंड उष्णता वाढलीय. प्रचंड रखरख वाढली असून दुपारच्या प्रहरात उन्हात न जाण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात येतोय. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात रविवारी (2 फेब्रुवारी) ला सर्वाधिक तापमान नोंदवले गेल्याचं पुणे विभागाचे हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी नोंदवले. त्यांनी x माध्यमावर पोस्ट करत कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होते हेही सांगितलंय.
2 Mar: Tmax in Maharashtra today above 36 °C:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 2, 2025
Parbhani 36.6
Kolhapur 35.5
Nasik 35.6
Satara 36.1
Beed 35.6
Thane 36.8
Sangli 37.2
Solapur 37.9
Ratnagiri 36.9⁰C, RH 63%
Pune 36.2
Jalgaon 36.2
Udgir 36.5
Jeur 37.5 pic.twitter.com/hXlr3isLNw
मुंबईकरांना मार्च उकाड्याचा महिना
गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात काहीशी घट झाली असली तरी मुंबईकरांना मात्र असह्य उन्हाळ्याच्या झळा बसणार आहेत . हवामान विभागाच्या अंदाजानुसार,उन्हाळ्यात मार्च ते मेदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असून उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता ही अधिक राहणार आहे.
फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा प्रचंड वाढल्या आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी 32.8 अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात 35.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली .ठाण्यात 36.6 अंश सेल्सिअस तापमान होते .येत्या पाच दिवसात बहुतांश भागात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचेही सांगण्यात आलंय .मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात तापमानात चढ उतार होत असून येत्या काही दिवसात पुन्हा तापमान वाढीचे संकेत आहेत .
हेही वाचा:
























