एक्स्प्लोर

ब्राह्मण समाजाचा अहवाल मागासवर्गीय आयोगाकडे पाठवणार : चंद्रकांत पाटील

जो समाज आरक्षण मागतो त्या समाजाचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतो. त्यामुळे ब्राम्हण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

सांगली : जो समाज आरक्षण मागतो त्या समाजाचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवतो. त्यामुळे ब्राम्हण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू असे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला आम्ही जाता-जाता आरक्षण दिले नाही. निवडणुकीसाठी आणखी वर्षभर आहेत. आमच्या खिशात अजून आणखी पत्ते आहेत. ते जसे बाहेर काढत जाऊ,  तसे 2019 ला आपण निवडणूक लढवूच नये, यावर विरोधकांना एकमत करावे लागेल, असा टोला चंद्रकात पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. ब्राम्हण समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी ब्राम्हण समाजाचा देखील अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे पाठवू असे सांगितले आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल सांगलीत महसूलमंत्री  पाटील यांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करुन समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. त्यामुळे गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही ब्राह्मण आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाला जातीच्या आधारे नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. "ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे. ब्राह्मण समाज मागासलेला असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाल्यास शासनाने आरक्षण द्यावे," असं आनंद दवे म्हणाले. मराठा समाजाच्या 16 टक्के आरक्षणाच्या विधेयकाला विधीमंडळात मंजुरी मिळाली असून राज्यपालांचीही त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर मुस्लीम आणि धनगर आरक्षणासह ब्राह्मण समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होत आहे. दुसरीकडे, गुजरातमध्येही ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासाठी मागणी होत आहे. गुजरातमध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या 9 टक्के आहे. त्यामुळे इथल्या ब्राह्मण समाजाने इतर मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेऊन ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget