एक्स्प्लोर
Advertisement
'राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोवर उधारी बंद', सलूनवाल्याची नामी शक्कल
दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये यासाठी दुकानात 'उधारी बंद आहे', 'आज रोख उद्या उधार' अशा अनेक पाट्या आपण पाहिल्या आहेत. परंतु दुकानातली उधारी बंद व्हावी यासाठी माढा शहरातील एका सलूनवाल्याने नामी शक्कल लढवली आहे.
सोलापूर : दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये यासाठी दुकानात 'उधारी बंद आहे', 'आज रोख उद्या उधार' अशा अनेक पाट्या आपण पाहिल्या आहेत. परंतु दुकानातली उधारी बंद व्हावी यासाठी माढा शहरातील एका सलूनवाल्याने नामी शक्कल लढवली आहे. या सलूनवाल्याने त्याच्या दुकानात लावलेली अफलातून पाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
माढा शहरातील सचिन जेन्टस पार्लरमध्ये मालकाने 'राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद' अशी पाटी लावली आहे. या पाटीमुळे अनेक लोक कुतुहलापोटी या दुकानात गर्दी करत आहेत. तसेच लोकांनी सलूनवाल्याला दाढी केल्यानंतर, केस कापल्यानंतर रोख पैसे देणे सुरु केले आहे.
सचिन या पाटीबाबत सांगतो की, "मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा चाहता आहे. ही पाटी लावण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा उद्देश नाही. मी केवळ दुकानातील उधारीचे व्यवहार बंद व्हावेत यासाठी ही पाटी लावली आहे."
सचिन म्हणाला की, "नोटबंदी आणि सध्याच्या दुष्काळामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जगणे मुश्किल झाल्याने उधारी बंद करण्यासाठी मला हे 'राहुल अस्त्र' वापरावे लागले आहे. या पाटीमुळे माझ्या 60 उधाऱ्या बंद झाल्या आहेत."
व्हिडीओ पाहा
सचिन म्हणाला की, "राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर बाजारातील पैशांचा तुटवडा कमी होईल, बाजारात पुन्हा पैसे फिरायला लागतील, त्यानंतर मी पुन्हा उधारी सुरु करेन."
आपण पुणेरी पाट्या अनेकदा पाहतो. या पाट्या पाहून हसतोदेखील परंतु सचिनच्या या पाटीमुळे त्याच्या दुकानातील उधारीचे व्यवहार कमी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement