नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन हायकोर्टाचा पोलिसांना सवाल
आमचा पोलिसांच्या कारवाईवर सवाल नाही, परंतु जे सत्य आहे त्या व्हॅनमध्ये जे काही घडले ते समोर येणे अत्यावश्यक आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : बदलापूर चिमुरडींवरील (Badlapur School Abuse Case) अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू झालीय. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकिलांना गंभीर सवाल केलेत. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय असं हायकोर्टाने म्हटलंय. रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल कोर्टाने केला आहे.
एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. आरोपीसा दुसरीकडे घेऊन जाताना तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणे त्याच्याकडे नव्हती. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? की हातावर किंवा पायावर मारता? त्या गाडीत जे पोलिस अधिकारी होते पूर्णपणे प्रशिक्षीत आणि पारंगत होते. अशा चार व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक अधिकारी ज्याने अनेक एन्काऊंटर यशस्वी केले आहेत, अशा पोलिस अधिकाऱ्यासमोर तो एकटा आरोपी वरचढ ठरून पोलीस अधिकाऱ्यांचे पिस्तूल हिसकावून गोळीबार कसे काय करेल ? असे सवाल हायकोर्टाने केले आहेत.
एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमध्ये काय घडलं? सत्य समोर आले पाहिचे : हायकोर्ट
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने काही सवाल उपस्थित केले आहे. परंतु कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की, आमचा पोलिसांच्या कारवाईवर सवाल नाही, परंतु जे सत्य आहे त्या व्हॅनमध्ये जे काही घडले ते समोर येणे अत्यावश्यक आहे त्यासाठी आता अक्षय शिंदेवर जी गोळी झाडली त्या हत्यारांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
गोळी चालवण्यामागचा नेमका हेतू काय होता? हायकोर्टाचे निर्देश
अक्षय शिंदेला जी गोळी झाडली ती किती अंतरावरुन झाडली? ती अक्षयच्या शरीराच्या कोणत्या भागावर लागली? कोणत्या भागातून बाहेर गेली? या सर्व गोष्टी फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट होतील, त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल सादर करा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. अक्षय शिंदेचा मृत्यू हा गोळी मारुन लागला हे पोस्टमार्टमधून स्पष्ट झाले आहे. परंतु ती गोळी चालवण्यामागचा नेमका हेतू काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :