एक्स्प्लोर

पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला हायकोर्टाची सशर्त परवानगी

पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे.

मुंबई : पुण्यातील 'सनबर्न' फेस्टिव्हलला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांप्रमाणे याचं आयोजन करावं आणि 75 डेसिबलच्या आवाजाची मर्यादा पाळण्याचे निर्देशही आयोजकांना दिलेत. तसंच या नियमांची आणि इतर कायदेशीर बाबींची अंमलबजावणी होतेय की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि राज्य सरकराची राहील असे निर्देशही हायकोर्टानं शुक्रवारी दिलेत. त्याचबरोबर ही याचिका खुली ठेवत यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनात काही नियमभंग झाल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा हायकोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. 'जर ही याचिका कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर न येता थोडी आधी आली असती तर ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणाच्या मुद्यावर याला परवानगीच नाकारली असती' असं विधान हायकोर्टानं केलं. ध्वनीप्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, केवळ भारतीय सणांवरच बंधन का? अशी प्रमुख मागणी करत अमोल बालवडकर यांच्यावतीने दाखल याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. ध्वनीप्रदुषणाबाबतची नियमावली स्पष्ट असतानाही आंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिव्हलच्या नावाखाली इथे ध्वनीप्रदूषणाचे सर्व नियम पायदळी तुडवले जातात. दुपारी ३ ते मध्यरात्री उशिरापर्यंत इथे डॉल्बी साऊंडवर डीजेचे कार्यक्रम कर्णकर्कश आवाजात सुरू असतात, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रवेशिकेवर 'कार्यक्रम रात्री 10 नंतर सुरु' असा स्पष्ट उल्लेख असल्याचे पुरावेही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात सादर केले. वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सांभाळून सण साजरे करण्याचं बंधन सर्वसामान्यांवरच का?  'सनबर्न'लाही कायदा सारखाच असायला हवा अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीनं अड. अनुराग जैन यांनी हायकोर्टात केली होती. त्यानुसार 'शांतता क्षेत्र नसलं तरीही ध्वनी मर्यादा आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलंय. नववर्षाच्या स्वागतासाठी 29 ते 31 डिसेंबर दरम्यान पुण्यातील बावधन लवळे इथल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबवर  यंदचा 'सनबर्न फेस्टिव्हल' रंगणार आहे. हा एक प्रतिष्ठित असा जगप्रसिद्ध संगीत महोत्सव असून जगभरातील प्रसिद्ध संगीत कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. दरवर्षी आम्ही सर्व प्रकारचे 19 परवाने काढतो त्यासाठी लाखो रूपयांचं शुल्कही अदा करतो. साधारणत: कार्यक्रम सुरु होण्याच्या २४ तास आधी सर्व परवाने घेतले जातात. तसेच आम्ही सर्व नियम आणि आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतो, मात्र तरीही दरवर्षी ऐन कार्यक्रमाच्या तोंडावर हायकोर्टात विरोध करणारी याचिका दाखल होते अशी बाजू सनबर्नचे आयोजक असलेल्या परसेप्टकडून मांडण्यात आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget