एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात थरार, क्षुल्लक कारणावरुन प्रियकराचा प्रेयसीवर ब्लेडने वार
नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यात प्रियकराने क्षुल्लक कारणावरून आपल्या प्रेयसीवर ब्लेडने वार करून जखमी केले. यात त्या महिलेचा बारा वर्षांचा मुलगाही जखमी झाला. महिलेच्या मानेवर लागल्याने तिला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, आरोपीला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.
नालासोपाऱ्यातील संतोष भुवन डोंगरी परिसरातील पांडुरंग कदम चाळीत राहणाऱ्या घटस्फोटीत महिलेशी मागील तीन वर्षांपासून आरोपी प्रियकराचे प्रेमसंबंध होते. महिला आपल्या दोन मुलांसोबत राहत होती.
काही दिवसापासून किरकोळ कारणावरून आरोपी आणि पीडित महिलेमध्ये भांडण होत होतं. अखेर भांडणाला कंटाळून महिला तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली.
आरोपी प्रियकराने काल गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास महिलेशी पुन्हा भांडण सुरु केलं. रागाच्या भरात त्याने हातातील ब्लेडने महिलेच्या गळ्यावर, हातावर, पाठीवर आणि पोटावर वार केले आहेत. या दरम्यान आईला सोडवायला आलेला बारा वर्षांच्या संदेशलाही ब्लेड हातावर लागून दुखापत झाली.
दरम्यान, तुळींज पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली. आरोपीने स्वतःवरही वार केले आहेत. आई आणि मुलाला जवळच्या वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. मुलाला उपचार करून सोडून देण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement