एक्स्प्लोर
सांगली महापालिका निवडणुकीत काळी जादू, करणी, भानामतीचे प्रकार
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी 1 ऑगस्टला मतदान होणार असून 3 ऑगस्टला मतमोजणी होईल.

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळी जादू, करणी आणि भानामतीचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या 19 नंबर वॉर्डमध्ये हा प्रकार घडला आहे. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दोन लिंबू, एक अंडी तर काही ठिकाणी एक लिंबू, दोन अंडी असे ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी 1 ऑगस्टला मतदान होणार असून 3 ऑगस्टला मतमोजणी होईल. एकूण 20 प्रभागांतील 78 जागांसाठी 541 उमेदवार रिंगणात आहेत. यंदा 18 प्रभागातून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये करणी, भानामती, काळा जादू असे प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मिरजेतही काळी बाहुली चौकात लटकवण्यात आली होती. आपला प्रतिस्पर्धी उमेदवार पडावा किंवा त्याला कमी मतं पडावीत आणि नागरिक मतदानास बाहेर पडू नये यासाठी काळी जादू केल्याची चर्चा सुरु आहे. सांगलीच्या स्फूर्ती चौकात प्रत्येक वळणावर असे प्रकार घडले आहेत. कोकणातून ही काळी जादू करुन आणल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























