एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आले. पारडी फाट्याजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होते. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पारडी फाट्याजवळ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विधानाबाबत या दौऱ्यावेळी बोलण्यास चक्क नकार दिला.
मुख्यमंत्री उस्मानाबादच्या भूम तालुक्यात आले असता, त्यांना माध्यमांनी जेव्हा दानवेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रश्न टाळून मुख्यमंत्री पुढे निघून गेले.
संबंधित बातम्या
दानवेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं मौन!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement