एक्स्प्लोर
भाजपच्या संवाद यात्रेची तारीख ठरली!
मुंबई : विरोधकांच्या संघर्ष यात्रेला संवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देण्याची भाजपने घोषणा केली होती. मात्र, तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. आज अखेर भाजपने संवाद यात्रेची तारीख जाहीर केली आहे. 25 ते 28 मे या दरम्यान भाजप राज्यातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती भाजपकडून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद–पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदानही करणार आहेत.
राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या अभूतपूर्व शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.
एकाच दिवशी 16 हजार सभा
संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी 25 मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम 28 मे रोजी पूर्ण होईल तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल.
कोण कुठे संवाद साधणार?
पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद करतील. त्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
बातम्या
Advertisement