एक्स्प्लोर

सांगली महापालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच स्वबळावर उतरणाऱ्या भाजपने आपला वचननामा जाहीर केला.

सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी येत्या एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठीचा पहिल्यांदाच स्वबळावर उतरणाऱ्या भाजपने आपला वचननामा जाहीर केला. 'मनात भाजप.. मनपात भाजप' असा नारा देत भाजपने महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सादर केला. सांगली महापालिका निवडणुकीला पहिल्यांदाच स्वबळावर सामोरे जाणाऱ्या भाजपने शहर आणि उपनगरांच्या सर्वांगीण विकासाची हमी वचननाम्यातून दिली आहे. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून “ लढाई अकार्यक्षमतेविरुद्ध कार्यक्षमतेची ” असा मथळा देण्यात आला आहे. भाजपच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे - विकास आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करणार - रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्पदरातील वैद्यकीय सेवा, पथदिवे, क्रीडांगणे, उद्याने, मंडई, विश्रामबाग परिसरात देखणे नाट्यगृह, नाना-नानी पार्क यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्ययावतीकरण - मनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय आणि संवादासाठी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन - शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, निधीचे योग्य वाटप व्हावे यासाठी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नियोजन समिती स्थापणार - महापालिका आणि व्यापारी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करून औद्योगिक क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार - परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार - महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स बसवणार - महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगासाठी उद्योजक गटांची निर्मिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य यासाठी नगरसेविका आणि होतकरू महिलांचा समावेश असलेली विशेष सुकाणु समिती - शहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणार - घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार - कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रियाकरून महापालिकेसाठी दरवर्षी दहा कोटींच्या उत्पन्नाची तरतूद करणार - मनपा शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटलायजेशन करून ई लर्निंगवर भर देणार, शिक्षण विभागासाठी विशेष निधी देणार - सीसीटीव्ही, रोड सेफ्टी बॅरिअर, व्हीएमएस बोर्ड व वायफाय सुविधांच्या माध्यमातून नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेणार - भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना राबवणार - गुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरणासोबतच आवश्यक त्या उपाययोजना राबविणार - चोवीस तास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा शेरीनाला प्रकल्प मार्गी लावून कृष्णा नदी व नदी पात्र स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी कटीबद्ध झोपडपट्टी पुनर्वसन, मनपाच्या आरक्षित भुखंडांचा विकास - मोफत वा माफक दरातील आरोग्यसेवा या जाहीरनाम्याबरोबरच गेल्या चार वर्षांत महापालिका क्षेत्रात भाजप नेत्यांनी केलेल्या कामाची जंत्रीच जनतेसमोर मांडण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Embed widget