एक्स्प्लोर

खडसेंनी गड राखला, नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय

‘सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली, गेल्या तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांवर भाजपला यश मिळालं,’ असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विजयानंतर म्हटलं आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. निवडणुकीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व बघायला मिळाले. मुक्ताईनगर नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 13 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपला सर्वाधिक 13, शिवसेनेला 3 आणि अपक्षांना एक जागा मिळाली. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नजमा तडवी या विजयी ठरल्या  आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. ‘सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली, गेल्या तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांवर भाजपला यश मिळालं,’ असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विजयानंतर म्हटलं आहे. या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. कारण एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा  खडसेंना  गड राखण्यात  यश आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दरम्यान,काही दिवसांपासून खडसे यांनी या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केलेलं होतं. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना मात्र खडसे यांनी मुक्ताईनगर येथे तळ ठोकला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भाजप अशी ही लढत होती.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget