एक्स्प्लोर

भाजपच्या जागा घटणार असल्याचा विनोद तावडे समितीचा अहवाल, राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात ऑपरेशन लोटस टू सुरू?

Operation Lotus 2 : भाजपच्या ऑपरेशन लोटस टू मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत भाजप असल्याची माहिती आहे. 

मुंबई: लोकसभा निवडणुकीला घेऊन देशात एकंदरीत काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती तयार केली होती. या समितीने प्रत्येक राज्यातील स्थानिक पदाधिकारी, अभ्यासक व विश्लेषक यांच्याकडून  माहिती घेऊन राज्यनिहाय आपला अहवाल तयात केला.  लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीने आपल्या अहवालात महाराष्ट्रात नकारात्मक स्थिती असल्याचे सांगितले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर केलेल्या या अहवालात समितीने सांगितले कि,  2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मध्ये दुहेरी आकड्यात पक्षाला नुकसान होणार आहे.  त्यानंतर  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगात पावले उचलत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांचे नॉट रिचेबल असणे, अमित शहांचा महाराष्ट्र्र दौरा, बावनकुळेंना दिल्लीला तडफडकी बोलावणी हे त्याच प्रक्रियेच्या घडामोडी असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटस टू मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांना भाजप आपल्या गळाला लावण्याच्या तयारीत आहे.

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे महाराष्ट्रातील 42 खासदार होते . शिंदे फडणवीस सरकारच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत भाजपचा हा आकडा 22 ते 25 च्या वर जाण्याची शकता कमी असल्याचे तावडे समितीच्या अहवालात पुढे आले आहे. अजित पवार उघड उघड बोलत नसले किंवा काँग्रेसच्या नेत्याच्या काही अडचणी असल्या तरी भाजप ऑपरेशन लोटस टू वर ठाम आहे. मात्र हे कधी व कसे करायचे याबद्दल भाजपचे केंद्रीय नेतृत्व अत्यंत सावध पावले टाकत आहे. होणाऱ्या राजकीय भूकंपाने  भाजपबद्दल राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होणार नाही याचीही काळजी भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेत आहे. त्यामुळे राज्यातील संजय सिरसाट यांच्यासारखे काही नेते हे कशासाठी थांबले आहे हे स्वतःच सांगत आहे .

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे एकमेव लक्ष लोकसभा निवडणुकीवर आहे. देशात महाराष्ट्रासह बिहार आणि कर्नाटक या राज्यात भाजपाला मोठे नुकसान होईल असेही तावडे समितीने अहवालात नमूद केले आहे . मात्र या तीन राज्यांपैकी ऑपरेशन लोटससाठी पोषक वातावरण सध्या महाराष्ट्र आहे असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटत आहे .त्यामुळे राज्यातच्या राजकारणात पडद्यामागे कमालीच्या हालचाली सुरु आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला कि बंडाच्या बातम्यात काही तथ्य नाही, मी राष्टवादी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत असेल. मात्र महाराष्ट्रासंदर्भात विनोद तावडे समितीचा आलेला अहवाल आणि पडद्यापाठीमागे घडत  असलेल्या घडामोडीने महाराष्ट्र राजकारणात ऑपरेशन लोटस टू ची चर्चा रंगली आहे.

ही बातमी वाचा: 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget