एक्स्प्लोर
भाजप शिक्षक संघटनेकडून विनोद तावडेंना घरचा आहेर
शाळेचा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांची पगारवाढ करण्यासंदर्भातला जीआर प्रसिद्ध केल्यानंतर. भाजपची शिक्षक आघाडी आक्रमक झाली आहे.
नागपूर : शिक्षकांच्या पगारवाढीच्या जीआरवरुन भाजपच्या शिक्षक आघाडीनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंनाच घरचा आहेर दिला आहे.
शाळेचा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांची पगारवाढ करण्यासंदर्भातला जीआर प्रसिद्ध केल्यानंतर. भाजपची शिक्षक आघाडी आक्रमक झाली आहे. ‘हा जीआर रद्द करावा नाही तर आंदोलन करू.’ असा इशाराच भाजपच्या शिक्षक आघाडीनं दिला आहे.
दरम्यान शिक्षक संघटनेच्या इशाऱ्यानंतरही विनोद तावडे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं समजतं आहे. यापूर्वी 12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळण्याची हमी होती. यापुढे शाळेची गुणवत्ता ‘अ’ दर्जाची असेल तरच शिक्षकांना पगारवाढ मिळणार आहे.
म्हणजेच ज्या शाळांचा नववी आणि दहावीला 80 टक्क्यांपेक्षा जास्त निकाल लागेल. अशाच शिक्षकांना श्रेणीनुसार वेतनवाढ मिळेल. पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement