एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule: जामीन मिळाला म्हणजे निर्दोष सुटलो असं वागणं बरोबर नाही, संजय राऊत यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

अफजल खानच्या कबरी जवळच्या बांधकामावर मविआ सरकार असताना कॉंग्रेस -राष्ट्रवादीचा दबाव असल्याने उद्धव ठाकरे यांना कारवाई करता आली नाही. मात्र आता हे खपवून घेतले जाणार नसल्याचेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

Nagpur News : संजय राऊत यांनी काय बोलायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता फक्त त्यांना जामीन मिळाला आहे, यानंतर न्यायालयात भरपूर सबमिशन करावे लागतात. केवळ जामीन मिळाला तर जल्लोष करणे, आणि निर्दोष सुटलो असं वागणं बरोबर नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली.

ओबीसी आरक्षणावर विचारले असता बावनकुळे म्हणाले की, यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिलं आहे. एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर बांठीया आयोगाचा अहवाल दिला आणि आरक्षण मिळालं. केवळ 93 नगरपालिकांमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ही तांत्रिक बाबींवर होणार आहे. या उर्वरित 93 नगरपालिकांमध्ये ही लवकरच आरक्षण मिळेल.

यावेळी 'वन नेशन वन इलेक्शन' यावर विचारले असता बावनकुळे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (One Nation One Election) यांनी एक देश एक निवडणूक या भूमिकेचे समर्थन केले आहे. राज्यातील अनेक पक्ष याच विचाराचे आहेत. मात्र या योजनेला सर्वपक्षीय एकमत मिळणे गरजेचे आहे.

...म्हणून उद्धव ठाकरे अनधिकृत बांधकाम काढू शकले नाही

अफजल खानाच्या कबरीला लागून अनधिकृत बांधकाम झालं असं गेल्या सरकारमध्ये अनेकांनी वारंवार सांगितले. या अतिक्रमणाविरोधात अनेक संघटनांनी विरोधही केला. यावर उद्धव ठाकरे यांची एकहाती सत्ता असती तर लगेच कारवाईही झाली असती. मात्र राज्यात तीन पक्षांचं सरकार होतं. म्हणून इच्छा असूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कारवाई करता आली नाही. त्याच्यावर कॉंग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) दबाव होता. त्यामुळे आता हे अनधिकृत बांधकाम तोंडल्याने राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचे अभिनंदन राज्यभरातून केले जात असल्याचे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आंदोलनाला वीस वर्षांनी यश!

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सांगलीतील माजी आमदार नितीन शिंदे यांच्या आंदोलनाला 20 वर्षांनी यश आलंय. नितीन शिंदे यांनी हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आंदोलन केलं होतं. 2001 साली चलो प्रतापगड अशी हाक देत त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं होतं.

हेही वाचा

Sanjay Raut: पहिल्याच पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा शिंदेवर हल्लाबोल, सरकार उपमुख्यमंत्री चालवतायत...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 08 PM 22 Sep 2024ABP Majha Headlines : 07 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray vs Pakistan : पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा इशाराABP Majha Headlines : 06 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Crime:  'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
 'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
Satara Accident : साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
Joe Biden forgets to introduce PM Modi : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव, व्हिडिओ व्हायरल; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
Video : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
Embed widget