(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोस्टरला काळं फासलं म्हणून मोदीजी लहान होणार नाहीत, इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक, बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल
पोस्टरला काळं फासलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Modi) लहान होणार नाहीत. इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
Chandrasekhar Bawankule : पंतप्रधान पदाबाबत बोलताना विरोधकांनी तारतम्य पाळलं पाहिजे असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केलं. विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत असं आम्ही करत नाहीत. पोस्टरला काळं फासलं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Modi) लहान होणार नाहीत. इंडिया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत असं बावनकुळे म्हणाले. महायुतीने ज्याप्रमाने महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय दिला आहे, त्यातून विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीनं लोकसभेत जनतेची दिशाभूल केली
शरद पवारसाहेब (Sharad Pawar) म्हणाले होते की, महाविकास आघाडीला 155 जागा मिळतील. आता म्हणतात 225 जागा मिळतील. लोकसभेत जनतेची दिशाभूल केलीत. पण खोटेपणा एकदाच चालतो, वारंवार नाही असे बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. महायुतीने ज्याप्रमाने महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय दिला आहे, त्यातून विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लोकोपयोगी योजना ते बंद पाडतील. महाविकास आघाडीला मत म्हणजे मोदी आणि महायुतीच्या योजना बंद पाडणे असे बावनकुळे म्हणाले.
डबल इंजिन सरकार राज्यांच्या विकासासाठी येणं गरजेचं
मोदी सरकारचा लाभ महाराष्ट्राला होण्यासाठी महायुती सरकार येणं आवश्यक असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. डबल इंजिन सरकार राज्यांच्या विकासासाठी येणं गरजेचं असल्याचे बावनकुळे म्हणाले.
उमेदवारी मिळणार असं समजून सुधाकर भालेराव तिकडे गेले
सुधाकर भालेराव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. भविष्यात आपल्याला उमेदवारी मिळणार असं समजून भालेराव तिकडे गेले आहेत.त्यांना आम्ही विधानासभेचं आश्वासन देऊ शकलो नाही असेही बावनकुळे म्हणाले. पक्षाने 2019 मध्ये मलाही तिकीट दिलं नाही असे बावनकुळे म्हणाले. संभाजी पाटील निलंगेकर किंवा मी कुणीही त्यांच्यावर अन्याय केला नाही. तिकिटांच्या मुद्द्यावर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बावनकुळे म्हमाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडे बहुमत, आम्हाला चिंता नाही
पंतप्रधान पदाबाबत तारतम्य पाळलं जावं असे बावनकुळे म्हणाले. विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत असं आम्ही करत नाहीत. पोस्टरला काळं फसलं म्हणून मोदीजी लहान होणार नाहीत. इंडीया आघाडीपेक्षा मोदींना 10 कोटी मतं अधिक आहेत असं बावनकुळे म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणालाच चिंतेची गरज नाही. ज्यांनी खेळ मांडलेला त्यांना खेळ लखलाभ असे बावनकुळे म्हणाले. मविआमुळं ही निवडणूक लादली गेली आहे. या निवडणुकीचे परिणाम मविआला भोगावे लागतील असंही बावनकुळे म्हणाले. विधानसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप काहीही चर्चा झाली नाही. महायुतीचे सर्व नेते याबाबत ठरवतील असे बावनकुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: