एक्स्प्लोर

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत भाजप भाकरी फिरवणार? फडणवीसांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक, 'त्या' आमदारांना फायनल वॉर्निंग

Assembly Elections: आगामी निवडणुकीमध्ये कोणाला संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने बैठका, दौरे, सभा अशा घडामोडी घडताना दिसत आहे.

Assembly Elections: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी हालचाली सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आगामी निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणाला संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने बैठका, दौरे, सभा अशा घडामोडी घडताना दिसत आहे. .

आगामी विधानसभाच्या (Assembly Elections) अनुषंगाने राज्यात सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदारांनी केलेली कामे, मिळालेले विजय आदी गोष्टी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आधी तपासल्या जात आहेत. त्याद्वारे पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाजपकडून भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.त्यांनी त्यांची कामगिरी सुधारली नाही, तर तिकिट कापले जाणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मुंबईतल्या बैठकीतही काही आमदारांना कामगिरी सुधारण्याची सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर भाजपकडून दौरे, बैठका घेतल्या जात आहेत. कोकण, मुंबईनंतर आज भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस सध्या प्रत्येक विभागवार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विभागनिहाय बैठका घेत आहेत.  परवा मराठवाडा विभागाची आमदारांची बैठक झाली. काल कोकण विभागातील आमदारांची बैठक पार पडली. 

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होते चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विभागनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल, किती गमावणार याची चाचपणी सुरू आहे. आपल्या विभागामध्ये कुठं नक्की फायदा होणार आणि कुठं तोटा होणार यावर चर्चा सुरू आहे. येत्या 2 महिन्यात कुठलं विकास काम केलं तर भाजपला फायदा होईल हे सुचवा असं आवाहन देखील या बैठकीच्या माध्यमातून केलं जात असल्याची माहिती आहे. 

विकास काम करा, निधी कमी पडणार नाही, असे निरोप आमदारांना  देण्यात आल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करा, आपल्या भागामध्ये संघटना मजबूत करा, मित्रपक्षांची नाराजी असल्यास दूर करा, स्थानिक पक्ष संघटना यांच्याशी जवळीक साधा. मराठा आरक्षण हे विरोधकांचे पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा. मराठा संघटनांचा विरोधाला सामोरे कसे जायचे यावर चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaAkhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Embed widget