महाविकास आघाडीचे 25 आमदार संपर्कात, निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येतील: रावसाहेब दानवे
महाविकास आघाडीचे 25 आमदार निवडणूक येताच भाजपमध्ये येतील असं रावसाहेब दानवे म्हणालेत.
जालना: आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील असं सांगत महाविकास आघाडीचे आमदार आपल्या संपर्कात आहेत असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि धुळवड आज साजरी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.
ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही असंही ते म्हणाले.
रावसाहेब दानवे म्हणाले की, "ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांच्यात जाऊन मिळाले तेंव्हाच त्यांचा भगवा रंग संपुष्टात आला. त्यांनी आता हिरवं पांघरून घेतलंय ,आता हिरव्याचं समर्थन करतात.
आज राहिलेली इज्जत वाचवण्यासाठी ते भगवा-भगवा करतात. भेसळ आमच्यात आहे का त्यांच्यात त्यांनी पाहावं. भेसळ दोन-तीन एकत्र आले की भेसळ होत असते."
रावसाहेब दानवे पुढे म्हणाली की, "दाऊद इब्राहिमसारख्या बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या पाठीमागे उभा राहणारा, त्याच्याशी फायनांशियल डिलिंग करणारा मंत्री जेलमध्ये गेला. तरीही त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या आघाडीची अरेरावी राज्यातील जनतेला सहन होणार नाही. भगवाधारी सगळे फक्त आमच्याकडेच आहेत."
आम्ही पाठीत वार कधी केला नाही तर यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिली नाही, ही शिवसेना उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची झालीय अशीही त्यांनी टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- ...तोपर्यंत दानवे कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी करणार नाही; पिंपरीतील नाभिक संघटनेचा इशारा
- समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं असेल तर राज्याला निम्मे पैसे द्यावे लागतील : रावसाहेब दानवे
- Raosaheb Danve : चार मंत्री युक्रेन-रशियाच्या आजूबाजूच्या देशात जाऊन भारतीयांना परत आणत आहेत, दानवेंची माहिती