(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP : आगामी निवडणुकीसाठी भाजपचं 'मोदी @9' जनसंपर्क अभियान, राज्यातील 11 जणांवर जबाबदारी
मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे आता मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. तसेच मोदी सरकरला देशात सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप मोदी @ 9 हे अभियान राबवणार आहे. महाराष्ट्रात या अभियानासाठी 11 जणांची समिती नेमली असून देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असून, त्यांच्यावर या मोहिमेची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे.
मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे आता मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान असणार असून, महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीने हे अभियान राबवले जाणार आहे.
मोदी @ 9 अभियानाची समिती
- प्रवीण दरेकर - संयोजक
- डॉ. संजय कुटे - सहसंयोजक
- श्रीकांत भारतीय
- जयकुमार रावल
- खा. डॉ. अनिल बोंडे
- खा. धनंजय महाडिक
- निरंजन डावखरे
- राणा जगजितसिंह पाटील
- चित्रा वाघ
- राहुल लोणीकर
- श्वेता शालिनी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुण्याला रवाना होण्याआधी मुंबई भाजपला अधिकाधिक तरुण मतदारांना पक्षाशी जोडण्याचा कानमंत्र दिला. नड्डांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यातूनही भाजपनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं स्पष्ट दिसून आले आहे.
नवीन मतदारांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न
येत्या निवडणुकीत भाजप नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात युवकांशी संवाद साधला. भाजपच्या वतीनं युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही परिस्थितीनुसार स्वत:ला बदलायला हवं. आणि तुम्ही स्वत:ला बदललं नाहीत तर सध्याच्या शर्यतीत तुम्ही मागे राहाल, असा सल्ला नड्डांनी तरुणांना दिला. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोदी सरकार पुढाकार घेत असल्याचंही त्यांनी तरुणांना सांगितलं. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन 18 ते 21 वर्षे वयोगटातल्या तरुणांची नावं मतदारयादीत नोंद करून घेण्याचा आदेश राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
राजाचा जीव पोपटात..., त्यामुळे काहीही झालं तर मुंबई महापालिका जिंकणारच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार