एक्स्प्लोर
Advertisement
भाजप आमदाराच्या दोन बायकांमधील हाणामारी, आमदार तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात तक्रार
पांढरकवडा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदविण्यात आली असून सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन बायका फजिती ऐका वाद काही दिवसपूर्वी पुढे आला होता. आमदार महोदयांच्या दोन पत्नींचा वाद मिटताना काही दिसत नाही.
यवतमाळ : भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नी विरुद्ध यवतमाळ जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली आहे.
VIDEO | आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात हाणामारी | यवतमाळ | एबीपी माझा
12 फेब्रुवारी रोजी त्यांना तोडसाम यांची पहिली पत्नी आणि तिच्या नातलगांनी भररस्त्यात मारहाण केली होती. त्याचे व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
याबाबत तक्रारीमध्ये आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया शिंदे तोडसाम यांनी धिंड काढणे, विनयभंग यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पांढरकवडा पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदविण्यात आली असून सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन बायका फजिती ऐका वाद काही दिवसपूर्वी पुढे आला होता. आमदार महोदयांच्या दोन पत्नींचा वाद मिटताना काही दिसत नाही.
दोन बायका फजिती ऐका, आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात हाणामारी
यवतमाळमधील आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भररस्त्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. 12 फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास त्यांच्यात वादावादी झाली होती. मग त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं होतं.
राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडा इथल्या वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी तोडसाम यांच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. मात्र पहिली पत्नी असूनही तोडसाम दुसऱ्या पत्नीसोबत राहत असल्याच्या कारणावरुन दोघींमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. पहिली पत्नी असूनही राजू तोडसाम हे गेल्या काही वर्षांपासून प्रिया यांच्यासोबत राहत आहेत. तोडसाम यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरा विवाह करुन तिच्याशी संसार थाटला आहे. प्रिया या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे एकत्र सहभागी होत असत. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या घडामोडींमुळे त्यांची पहिली पत्नी त्रस्त होती. या विषयावरुन दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होऊन हाणामारी झाली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्रीडा
करमणूक
Advertisement