हट्टीपणा सोडा EWS मधून आरक्षण घ्या! निवडणुका आल्या की मनोज जरांगे बेडकासारखे ओरडतात, भाजप नेत्याचा हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांजे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. त्यावर बोलताना भाजप आमदार परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
Parinay Fuke on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांजे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. त्यावर बोलताना भाजप आमदार परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. ज्याप्रमाणे पावसाळ्यात बेडूक बाहेर निघतो तसे निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर निघतात असा खोचक टोला त्यांनी लगावला. जर युवकांचे भलं करायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ डब्ल्यू एस मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे. जेणेकरून मराठी युवकांचा विकास होईल. आता तरी जरांगे पाटील यांनी हट्टीपना सोडून द्यावा असे वक्तव्य परिणय फुके यांनी गोंदियात .
2047 पर्यंत राहुल गांधी यांनी सत्तेबाहेर राहण्याचे ठरवलंय
2047 पर्यंत काँग्रेसने राहुल गांधी यांनी सत्तेबाहेर राहण्याचे ठरवले आहे. प्रत्येक दहा वर्षात कोणते आरोप करायचे यांचे नियोजन राहुल गांधी यांनी करुन ठेवल्याची टीका परिणय फुके यांनी केली. राहुल गांधी यांनी वोट अधिकार यात्रा सुरु केली आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार परिणय फुके म्हणाले की, राहुल गांधीला चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोग बोलावते तिथे ते जात नाहीत, मात्र जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे ते वक्तव्य करत राहतात. 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी ईव्हीएम वर बोट दाखवलं. 2024 ते 2034 पर्यंत आपल्या हारण्याचा खापर ते निवडणूक आयोगावर फोडतील. 2034 ते 2044 काहीतरी नवीन मुद्दा आणून ते खापर फोडतील अशी खोचक टीका त्यांनी राहुल गांधींवर केली. 2044 नाहीतर 2047 पर्यंत काँग्रेसने सत्ते बाहेर राहण्याची तयारी करुन ठेवली आहे. प्रत्येक दहा वर्षात काय बोलायचे हे आरोप त्यांनी ठरवून ठेवल्याची टीका त्यांनी राहुल गांधींवर केली.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार, विजयाचा गुलाल उधळायचाच, जरांगे पाटलांचा निर्धार
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय. ते सध्या मुंबई मोर्चाच्या अनुषंगाने मराठा बांधवाशी संवाद साधत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार























