(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitesh Rane: पोलिसांना 24 तास सुट्टी द्या, आणि मग पाहा! नितेश राणे यांचे आव्हान
विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघू, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Nitesh Rane: "देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघू. त्यांना जागोजागी चपलांचे हार घालते जातील. त्यानंतर चपला मोजायचे काम त्यांनी करावं, भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. 24 तास पोलिसांना सुट्टी द्या आणि मग बघा, असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चपल फेकण्यात आलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादीला आव्हान दिले. नितेश राणे यांनी यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.
नितेश राणे म्हणाले, "काल एका पत्रकाराने मला फोटो पाठवला. त्यामध्ये आदित्य ठाकरे मेट्रोच्या एका डब्याची पाहणी करत होते. त्या डब्यावर लिहले होते की 'केवळ महिलांसाठी', आता यावर काय बोलणार. मॅवमॅव केवळ आवाजच नाही तर ड्रग आहे. या ड्रगने तरुण पिढी बरबाद केली. आता मी बेलवर बाहेर आहे. त्यामुळे ट्वीट करत नाही. माझ्यामागे एवढे पोलीस लागतात की, मी माझ्या गाडीतून परत जाईन की पोलिसांच्या गाडीतून जाईन हे कळत नाही, असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लागवाला.
"दिशा सालीयनच्या मृत्यूवरून आम्ही सांगत आहोत की, आपली मुलगी, बहीण सुरक्षित आहे का? आम्ही काल आमच्या जबाबामध्ये एका मंत्र्याचे नाव सांगत होतो. परंतु, पोलीस त्यांचे नाव घेत नव्हते. पहिले शक्ती कायद्याचे नाव दिशा कायदा होते. परंतु, मी चिरफाड करणार हे कळताच नाव बदलून ते शक्ती केले. मुंबईच्या महापौर दिशा सालीयनच्या घरी गेल्यानंतर आमच्याविरोधात तक्रार दाखल झाली, असा आरोप नितेश राणे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिकांचा का नाही? नितेश राणे यांचा प्रश्न
- Disha Salian Case : मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं : नारायण राणे
- Disha Salian : दिशा सालियनने आत्महत्या का केली? आई-वडिलांनी स्पष्टच सांगितले
- Chandrakant Patil : दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट