एक्स्प्लोर

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त, आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे

नागपूर : खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचं पत्र लिहिलं आहे, ज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी ही रास्त असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राइम कॅपिटल बनलं, असं आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आशिष देशमुख यांनी पत्रात काय म्हटलंय? आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पामुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. ''मेट्रो प्रकल्प थांबवा, शेतकरी आत्महत्या रोखा'' मेट्रो रेल्वे प्रकल्प रोखून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशीही मागणी आशिष देशमुख यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. राज्य सरकार केवळ शहरी विकासाकडे लक्ष देत आहे. ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक राज्य सरकारला चौफेर घेरण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनीच या पत्राद्वारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी : मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget