एक्स्प्लोर

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह मजकूर, चंद्रकांत पाटील म्हणाले...

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल.

मुंबई - भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ट्वीटला रिट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, यामागे कोण आहे त्यांचा भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्री जी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकुर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या रक्षा खडसे या प्रकारावर बोलताना रक्षा खडसे यांनी म्हटलं की, कालच ही गोष्ट आपल्याला कळली होती. त्यावेळी आपण भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहिलं असता हे दिसून आलेलं नाही. त्यामुळे पक्षाकडून असं झालं असेल आपल्याला वाटत नाही. पक्षाच्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट काढून त्याचा हा दुरुपयोग केला गेला असावा. या संदर्भात आपण पोलिसांना कळवले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल. मात्र हे कुणी केलं असेल मग ते सत्ताधारी असू देत अथवा विरोधक असू दे एखाद्या महिला लोकप्रतिनिधीची अशी बदनामी करणं योग्य नाही. झाल्या प्रकारानं मला दुःख झालं आहे. पक्ष देखील याचा खुलासा करेलच, असं खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. माझं यासंदर्भात काल पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झालं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत, असं त्या म्हणाल्या.

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेखाबाबत खासदार रक्षा खडसे म्हणतात....

असं कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे- गुलाबराव पाटील

कोणत्याही महिलेबाबत कुणीही असं आक्षेपार्ह पोस्ट टाकत असेल तर अशा व्यक्तीला केवळ चौकशी नव्हे तर शिक्षा केली गेली पाहीजे. कारण महिलांचा सन्मान करणारं हे राज्य आहे आणि देश आहे. अशा प्रकारचा चावटपणा जर कुणी करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल

काय आहे प्रकरण?

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचं अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल."

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Gen Z Nagpur : नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
नगरसेवक ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास; 'दबाव' कसा हाताळतात?, देवेंद्र फडणवीसांनी दिली Gen Zच्या प्रश्नावर उत्तर, जुना किस्साही सांगितला
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
Nursing Exam Paper Leak: नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
पाच महिन्यांपूर्वी लग्न अन् तीन महिन्यांची गर्भवती, संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्यानं आयुष्य संपवल्याने खळबळ
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
Embed widget