एक्स्प्लोर

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेखाबाबत खासदार रक्षा खडसे म्हणतात....

एखाद्या महिला लोकप्रतिनिधीची अशी बदनामी करणं योग्य नाही. झाल्या प्रकारानं मला दुःख झालं आहे. पक्ष देखील याचा खुलासा करेलच, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

जळगाव : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आली होती. या प्रकारावर बोलताना रक्षा खडसे यांनी म्हटलं की, कालच ही गोष्ट आपल्याला कळली होती. त्यावेळी आपण भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहिलं असता हे दिसून आलेलं नाही. त्यामुळे पक्षाकडून असं झालं असेल आपल्याला वाटत नाही. पक्षाच्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट काढून त्याचा हा दुरुपयोग केला गेला असावा. या संदर्भात आपण पोलिसांना कळवले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल.

मात्र हे कुणी केलं असेल मग ते सत्ताधारी असू देत अथवा विरोधक असू दे एखाद्या महिला लोकप्रतिनिधीची अशी बदनामी करणं योग्य नाही. झाल्या प्रकारानं मला दुःख झालं आहे. पक्ष देखील याचा खुलासा करेलच, असं खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

माझं यासंदर्भात काल पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झालं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत, असं त्या म्हणाल्या.

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल

 असं कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे- गुलाबराव पाटील

कोणत्याही महिलेबाबत कुणीही असं आक्षेपार्ह पोस्ट टाकत असेल तर अशा व्यक्तीला केवळ चौकशी नव्हे तर शिक्षा केली गेली पाहीजे. कारण महिलांचा सन्मान करणारं हे राज्य आहे आणि देश आहे. अशा प्रकारचा चावटपणा जर कुणी करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसेजी यांचं अपमानजनक वर्णन पाहून धक्का बसला. अशाप्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल."

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget