एक्स्प्लोर

Anil Bonde on Nana Patole : नाना पटोलेंना चिखल लावून निषेध नोंदवणार; भाजप नेत्याचा थेट इशारा, म्हणाले... 

नाना पटोले यांच्या कृतीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलय. तसेच भाजप नाना पटोले यांना चिखल लावून या घटनेचा निषेध नोंदवणार, असा इशाराही त्यांनी दिलाय.

अमरावती :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कृतीमुळे महायुतीमधील नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपमधील एका नेत्याने  नाना पटोलेंच्या या कृतीचा निषेध नोंदवत थेट इशारा दिला आहे. नाना पटोले जिथे जिथे जातील तिथे त्यांना चिखलात लोळवण जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठे कुठे धुवून घेतील हे त्यांना माहिती पडेल. काँग्रेसवाल्यांची ही मस्ती आहे. यात त्यांना थोडसं जरी यश मिळालं तर त्यांच्या डोक्यामध्ये सम्राटपणा जातो, सरंजामी जाते. सामान्य माणसांवर अन्याय करणे सुरू करतात. गुलामी सुरू करतात. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलय. तसेच भाजप नाना पटोले यांना चिखल लावून या घटनेचा निषेध नोंदवणार, असा इशाराही  त्यांनी दिलाय.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांच्या डोक्यामध्ये मस्ती गेलीय - अनिल बोंडे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचे पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यात नवल नाही. त्यांची हीच मानसिकत आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांना एवढ्या जागा आल्या म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती गेलीय. एका साध्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणे. मी खूप मोठा आहे, सम्राट आहे आणि मी सगळं जग जिंकलं, अशा मानसिकतेतून नाना पटोले यांनी नेहमीप्रमाणे उद्दामपणा दाखवल्याचा हल्लाबोल भाजप नेते अनिल बोंडे यांनी करत नाना पाटोले यांच्या या कृतीचा निषेध नोंदवलाय. अशा लोकांची मस्ती जिरवल्याशिवाय उपाय नाही. सामान्य माणसाला कचऱ्यासारखे समजतात. आणि स्वतः चिखलाने भरलेले पाय धुवून घेतात. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन देखील अनिल बोंडे यांनी केले आहे.   

7 वर्षांपूर्वी भाजप नेत्यांकडूनही असाच प्रकार

अकोला जिल्ह्यातील वाडेगावात नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका काँग्रेस कार्यकर्त्याने धुवून दिले होते. या कृतीवरून राज्यभरात नाना पटोलेंवर राज्यभरात विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र, अशीच घटना सात वर्षांपूर्वी अकोल्यातच घडली होती. 25 मे 2017 रोजी अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे गावात भाजप नेत्यांनी आपले पाय शेतकऱ्यांकडून धुवून घेतल्याचा प्रकार घडला होता. भाजपच्या दीनदयाल उपाध्याय शेतकरी संवाद यात्रेदरम्यान हा प्रकार घडला होता. भाजपचे तत्कालिन खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र भाजपचे तत्कालीन संघटनमंत्री रवी भुसारी आणि आमदार रणधीर सावरकर यांचे पाय यावेळी शेतकऱ्यांनी धुतले होते.

विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही आनंदाने ह्या प्रकाराला विरोध न करता स्वत:चे पाय धूवून घेतले होते. काँग्रेससह विरोधकांनी या प्रकारावर तेंव्हा मोठी टीका केली होती. भाजपचे संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांना पक्ष आणि संघाकडे स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं पद गेलं होतं.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Crime Update | त्या रात्री जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग, वर्दी खेचण्याचा केला प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Update | नागपुरातील हिंसारग्रस्त परिसर वगळता नागपुरातील जनजीवन सामान्य,वाहतूक सेवा नियमितपणे सुरुSunita Williams & Butch Wilmore returns : अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
Embed widget