Holi 2022 : महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? : राम कदम
Ram Kadam Tweet : विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच, असे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
Ram Kadam Tweet : आज होळी. सर्वत्र होळीची लगबग सुरु आहे. सध्या राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी (Holi 2022) आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सरकारनं जारी केलेल्या नियमावलीमुळे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच, असे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीट केलंय की, "महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिन्दू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणी रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. आहो तुम्ही घाबरट असाल. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळतं स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात."
दरम्यान, रात्री दहाच्या आत होळी पेटवण्याचे बंधन राज्य सरकारनं घातलं आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी डीजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागानं मार्गदर्शक नियमावलीत केली आहे.
होळी धुळवडीसाठी सरकारची नियमावली
- रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक
- डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई
- होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
- महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
- दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई
- कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
- धुळवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये