![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pravin Darekar : एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी, भाजपची मागणी, तर छगन भुजबळ म्हणाले...
अलिकडच्या काळातील जर सर्व कृत्य पाहिली तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.
![Pravin Darekar : एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी, भाजपची मागणी, तर छगन भुजबळ म्हणाले... Bjp Leader Pravin Darekar demands that Presidential rule should be imposed in the state Pravin Darekar : एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावावी, भाजपची मागणी, तर छगन भुजबळ म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/39848c792f1e8093e63d1ff834bea36a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pravin Darekar : सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे राज्यात कधीच झाले नव्हते असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. अलिकडच्या काळातील जर सर्व कृत्य पाहिली तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. आमची आज बैठक होणार आहे, या बैठकीत नेमकं काय करायचे याबाबत निर्णय होणार आहे असेही दरेकर यावेळी म्हणाले.
भाजपला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची फार घाई
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची फार घाई झाली आहे. त्याच्यामुळे ते कोणावर ईडीचे प्रयोग कर, कोणावर सीबीआयचे प्रयोग कर हे सगळे चालू आहे. त्यातून राज्यात मारामाऱ्या सुरु आहेत, दंगे सुरु आहेत, सरकार अस्तित्वात नाही असे चित्र त्यांना उभे करायचे असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. भाजपचे लोक सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे त्यांचे प्रयत्न सफल होणार नसल्याचे भुजबळ म्हणाले. तुम्हाला पुजा अर्चा करायची तर तुमच्या घरात करा किंवा मंदिरात करा. तुमच्या अमरावतीला मंदिर आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.
मुख्यमंत्री हस्तक्षेप का करत नाहीत : दरेकर
आता नाकातोंडात पाणी जात आहे. सत्ता येत असते जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नसल्याचे प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. हे वेळीच थांबले नाहीतर एका बाजूने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल. त्यामुळे थांबल पाहिजे असे दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री याबाबत का हस्तक्षेप करत नाहीत असे ते म्हणाले. राजकीय कामांसाठी पोलिसांचा वापर होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)