एक्स्प्लोर

Chandrakant Patil : एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील

शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. भाजपकडे एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil  : भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नाही. आमची 13 जणांचा कमिटी आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही चर्चा करुन सांगतो असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मोहित कंबोज भाजप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा देखील चांगला मित्र आहे. त्याचे सगळ्याच पक्षात चांगले मित्र असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका मी मांडतो

राज्यामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्याचा भाजपशी  काहीही संबंध नसल्याची भूमिका पाटील यांनी मांडली. सत्ता परिवर्तनाबद्दल मला काही माहित नाही. सध्या आम्ही राज्यातील 16 मतदारसंघामध्ये काम करत आहोत. राज्यातील घटनांशी आमचा काही संबंध नसल्याचे पाटील म्हणाले. शरद पवार आणि नारायण राणे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं याबद्दल मला काही माहित नाही. महाराष्ट्रात भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, पण आमच्या सगळ्या नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत असे पाटील म्हणाले. आपण एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे, काही गोष्टी सुरु असल्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रत्येक गोष्टीचा पुरेसा आधी आणि पुरेसा नंतर विचार करतो. सकाळी मी हे पेपरमध्ये वाचलं की उद्धव ठाकरे यांची एक्सिट आहे म्हणून. पण मला वाटत नाही की कोण आपली इतकी बदनामी करुन घेईल. हा अभ्यासाचा विषय असल्याचे पाटील म्हणाले.      

मोहीत कंबोज यांचे सगळ्याच पक्षात मित्र

मोहीत कंबोज सगळ्यांचाच मित्र आहे. तो एकनाथ शिंदे यांचा देखील मित्र आहे. मोहित कंबोज तिकडे गेल्याबद्दल मला काही माहित नसल्याचे पाटील म्हणाले. दिसला असेल तर त्याचे सगळ्याच पक्षात मित्र आहेत असे पाटील म्हणाले. संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचे ते मला माहिती नाही. ते सकाळी एक बोलतात दुपारी वेगळचं म्हणतात असेही पाटील म्हणाले. 

विधानपरिषद आणि राज्यसभेच्या विजयानंतर लोकांना खूप आनंद झाला आहे. गावोगावचे लोक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला येत आहेत. अपक्ष जे आमच्याबरोबर आहेत. त्यांना विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दबाव आला असल्याचे पाटील म्हणाले. मला जे सांगायचे ते मी लगेच सांगतो. एवढा वेळ लावत नाही. पण काहीतरी चाललय असेही पाटील म्हणाले. राज्यामध्ये ज्या उलाथापालथी सुरु आहेत. त्याबाबत आपल्यालाला काहीही माहित नाही. या गोष्टींबद्दल मी अनभिज्ञ आहे, असे म्हणत पाटील यांनी सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करत तटस्थ भूमिका घेतली.  

महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Iran War Live Update: 'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
'आता परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार असेल' अमेरिकेने शस्त्रसंधीचा भंग केला, इराणचा गंभीर आरोप
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
थलपती विजयला पाठिंबा देणार हे द्रमुकला अगोदरच सांगितलेलं, इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story

Embed widget