एक्स्प्लोर

बीडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे भगिणी गैरहजर, राजकीय चर्चांना उधाण  

Beed News Update : गहिनीनाथ गडावरील हा पहिला कार्यक्रम होता की ज्यावेळी मुंडे कुटुंबीयांपैकी कोणीही व्यक्ती व्यासपीठावर नव्हते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या गैरहजेरीची मात्र, राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

Beed News Update : बीड जिल्ह्यातील गहीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी आज तेथे भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित नव्हत्या. मंडे भगिणींच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  

वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा सोहळा महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या गडावर मुंडे भावंड परंपरेनुसार दरवर्षी एका  व्यासपीठावर येतात. मात्र राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्याने यंदा ते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नव्हते. परंतु, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हत्या. त्यामुळे यंदा गहिनीनाथ गडावरील हा सोहळा प्रथमच मुंडे कुटुंबीयांशिवाय पार पडला. शिवाय पंकजा मुंडे यांचे समर्थक जि.प.सदस्य रामदास बडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बॅनरवरून हटवल्याने देखील चर्चंना उधाण आले आहे.  

गहिनीनाथ गडावरील हा पहिला कार्यक्रम होता की ज्यावेळी मुंडे कुटुंबीयांपैकी कोणीही व्यक्ती व्यासपीठावर नव्हते. धनंजय मुंडे दरवर्षी पहाटेच्या वेळी पूजा करायचे. दर वर्षी ते रात्रीच मुक्कामी गडावर येत असत आणि पहाटे पूजा करून दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. मात्र यावर्षी ते रूग्णालयात उपचार घेत असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, यंदा प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली नाही. गहिनीनाथ गडावर येणारी भक्त मंडळी पंकजा मुंडे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे किंवा प्रितम मुंडे या व्यासपीठावर नसणार आहेत हे समजल्यानंतर अनेक भाविकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होण्याआधीच गड सोडला.  

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या ओरंगाबाद येथील सभेला देखील पंकजा मुंडे यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तरी देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. परंतु, आवघ्या एका मिनिटात आपलं भाषण त्यांनी आवरलं होतं. तेव्हा देखील त्यांची नाराजी असल्याचं बोललं जात होतं. आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित नव्हत्या.  त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. 

दरम्यान, आजारी असल्याने पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. तर प्रितम मुंडे देखील बीडमध्ये नाहीत त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही अशी माहिती समोर येत आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!Pune : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत, जुन्या वादातून हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैदChhatrapati Sambhaji Nagar Rada : संभाजीनगरमध्ये  मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडाSatara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Embed widget