एक्स्प्लोर
भाजपच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, काही नावांवर शिक्कामोर्तब : सूत्र
पुणे : राज्यीतल मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग आला असून, नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवर भाजपनं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आहे. पुण्यात आज भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवर चर्चा झाली.
पुण्यातील बैठकीत चर्चा केलेली नावं दिल्लीला पाठवण्यात येतील. दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं घोंगडं भिजत पडलं आहे. कुणा नव्या चेहऱ्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय, विभागानुसार मंत्रिपदांचं वाटप होईल का, हेही पाहावं लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement