एक्स्प्लोर

BJP Candidates 2nd List for Lok Sabha : सीएम शिंदेंना मुंबईचा नाद सोडायला लावला, दोन खासदाराचा पत्ता कट; भाजपचा मुंबईत मोठा डाव!

मुंबईमधील दोन खासदारांचा पत्ता कट करून मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे.

 BJP Candidates 2nd List for Lok Sabha : महायुतीमधील जागावाटपावरून काथ्याकूट सुरू असतानाच भाजपने थेट 20 जागांवर उमेदवार घोषित करून मोठी मजल मारली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करून बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मुंबईमधील दोन खासदारांचा पत्ता कट करून मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. जागावाटपामध्ये अजूनही काही जागांवरती दावा अजूनही वाद सुरू असला तरी सेफ असलेल्या जागांवरती भाजपने उमेदवार घोषित केले आहेत. 

सीएम शिंदेंना मुंबईचा नाद सोडायला लावला! 

शिंदे गट राज्यात धनुष्यबाणावर लोकसभेच्या 13 जागा लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने शिंदेंना मुंबईचा नाद सोडायला लावला आहे. मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. शिंदेंकडे मुंबईतील दोन खासदार आहेत. यामध्ये राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदेंनी गजानन कीर्तिकर यांच्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेच्या बदल्यात ठाण्याची जागा मागितल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंचं तिकीट कन्फर्म झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण शिंदेंनी विद्यमान खासदार गजानन किर्तीकरांची जागा भाजपला सोडल्याने आता गजानन किर्तीकर लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांचं पुनर्वसन कोणत्या ठिकाणी केलं जाणार हा प्रश्न आहे. 

मुंबईत भाजपने दोघांचे तिकिट कापले

आगामी लोकसभा, विधानसभा आणि तसेच मुंबई मनपाच्या निवडणुकीवर वर्चस्व राखण्यासाठी आणि ठाकरेंचा सामना करण्यासाठी भाजपने प्रयत्न केल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या जागी पियुष गोयल यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई ईशान्य भागातून मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आले आहे. येथून मनोज कोटक यांचे तिकिट कापण्यात आलं आहे. 

उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांना रिंगणात उतरवण्यात आलं असून ही जागा भाजपचे वर्चस्व मानली जाते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी येथून विजयी झाले. एकप्रकारे भाजपसाठी ही जागा 'सेफ' म्हणूनही पाहिली जात आहे. पीयूष गोयल हे राज्यसभेचे खासदार असून मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. यावेळी त्यांना लोकसभा निवडणूक लढवून पक्षाला संसदेत आणायचे आहे.

शेट्टी यांनी पहिल्यांदाच नवा चेहरा म्हणून निवडणूक लढवली

गोपाळ शेट्टी यांना 2014 मध्ये पक्षाने त्यांना या जागेवरून पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा ते नवा चेहरा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 2014 मध्ये भाजप पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होता. गोपाळ शेट्टी 2014 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. यानंतर पक्षाने त्यांना 2019 मध्ये पुन्हा तिकीट दिले. या जागेवरून काँग्रेसने फिल्मस्टार उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती, ज्यांचा भाजपच्या शेट्टी यांनी सुमारे 4.5 लाख मतांनी पराभव केला होता.

भाजपचे राम नाईक यांनी येथून सातत्याने अनेक निवडणुका जिंकल्या

या जागेवरून भाजपचे दिग्गज नेते राम नाईक दीर्घकाळ खासदार होते. 1989 ते 2004 पर्यंत, त्यांनी भाजपकडून सातत्याने निवडणूक जिंकली, परंतु 2004 मध्ये ते चित्रपट स्टार गोविंदा आणि 2009 मध्ये काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्याकडून निवडणूक हरले. त्यानंतर 2014 मध्ये ही जागा पुन्हा भाजपकडे आली. यावेळी भाजपने आपले तगडे नेते पियुष गोयल यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना येथून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. या जागेवर मतदारांची संख्या 17 लाखांहून अधिक असून, या जागेकडे शहरी भाग म्हणून पाहिले जाते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget