एक्स्प्लोर

‘अंनिस’कडून स्मशानात बर्थडे, भाजपकडून स्मशानभूमीचं शुद्धीकरण

अंनिसने समाजप्रबोधनाच्या हेतूने केलेला कार्यक्रम हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

परभणी : जिंतूरमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि भाजप आमने-सामने आले आहेत. स्मशानभूमीबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, या उद्देशाने अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला, मात्र या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भाजपने स्मशानभूमीचं शुद्धीकरण केलं. यावरुन जिंतूरमध्ये भाजप आणि अंनिसमध्ये वाद सुरु झाला आहे. स्मशानात वाढदिवस साजरा अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी 19 सप्टेंबर रोजी ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्मशानभूमीतच केक कापण्यात आला. मांसाहारासह जेवणही ठेवण्यात आले. परिसरातील अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. या कार्यक्रमामागे ‘अंनिस’चा उद्देश काय? मांसाहार करुन स्मशानभूमीकडे जाऊ नये, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे फिरकू नये, यांसह अनेक अंधश्रद्धा आजही लोकांमध्ये आहेत. हेच हेरुन ‘अंनिस’ने लोकांच्या मनात स्मशानभूमीबाबत असलेली भीती दूर करण्याचे ठरवले. त्यातूनच थेट स्मशानभूमीत जाऊन वाढदिवस साजरा केला आणि स्मशानभूमीत जाण्यास घाबरु नये, असा संदेश दिला. लोकांनी निर्भयपणे जगावे, असा उद्देश ‘अंनिस’चा होता. भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांकडून स्मशानभूमीचं शुद्धीकरण लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अंनिसने केलेल्या स्मशानभूमीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केलाय. पुरोहित आणि हिंदू समाजातील महाराजांच्या उपस्थितीत स्मशानभूमीत गोमुत्र शिंपडून आणि मंत्रोच्चाराचा घोष करुन शुद्धीकरण करण्यात आलं. तसेच, स्मशानभूमीत मांसाहार करणाऱ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, अंनिसने समाजप्रबोधनाच्या हेतूने केलेला कार्यक्रम हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Maharashtra Live News Updates: वसई-विरारकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर, 2030 पर्यंत विरारपर्यंत पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका पूर्ण करण्याचे लक्ष्य
वसई-विरारकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर, 2030 पर्यंत विरारपर्यंत पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका पूर्ण करण्याचे लक्ष्य
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget