एक्स्प्लोर

भाजपकडून आमच्या आमदारांना कोट्यवधींच्या ऑफर; विजय वडेट्टीवारांचा आरोप

राज्यात सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आमच्या आमदारांना भाजपकडून फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई : भाजप आमच्या आमदारांवर दबाव आणत असून त्यांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या संदर्भात आमच्या आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. शिवसेना आमदारालाही ५० कोटींची ऑफर दिल्याचा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच आता आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचा पॅटर्न रावबला जाऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आमच्या इगतपुरीच्या आमदारांना भाजपकडून फोन आल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमचे आमदार फुटणार नाही जे फुटणारे होते ते आधीच गेल्यामुळे आमचे आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून काँग्रेसच्या आमदारांना फोन टॅप करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवण्यात आल्याच्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, की असे काही करण्यात आलेले नाही. जे आमदार गेले असतील ते पर्यटनासाठी गेले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही भाजपवर आरोप नाशिकमधील काँग्रेसच्या आमदाराला २० कोटी रुपयांची ऑफर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी दिली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आम्हाला आणखी कोणीही संपर्क केलेला नाही. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे ते कुठेही जाणार नसल्याचा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मोदी-शाहांचा डाव असल्याचंही ते म्हणाले तर, फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळेच भाजपला जनतेने धडा शिकवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी एबीपी माझाने काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना संपर्क केला असता, कोणचाही फोन आला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मध्यस्थीसाठी त्यांना कार्यकर्ते भेटायला आले असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित बातम्या : महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत ...मग शिवसेना राम जन्मभूमी आणि सावरकरांबद्दलची भूमिका सोडणार का? - चंद्रकांत पाटील

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget