पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात न लावल्याने भाजप कार्यकर्त्यांचा राडा
अमरावती अध्यक्षांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो न लावल्याने भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
अमरावती : अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. अध्यक्षांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे फोटो न लावल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
अमरावती भाजप ग्रामीणचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अध्यक्षांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि अध्यक्षांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीला हार घालत त्यांचा जाहीर निषेध केला. सुदैवाने हा सगळा प्रकार घडला त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या दालनात उपस्थित नव्हते.
ify;">
अमरावती जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोनिया गांधी, राहुल गांधी व स्थानिक आमदार यांचे फोटो लागले आहेत. मात्र ते फोटो भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान काढून फेकले. या सर्व राड्यामुळे येत्या काळात अमरावती जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.