एक्स्प्लोर
ज्यु.कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी, खासगी क्लासवर नियंत्रण
खाजगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने, विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचं तावडे म्हणाले.
नागपूर: खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली.
शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी खाजगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर विनोद तावडे यांनी उत्तर दिलं.
मात्र विनोद तावडे यांनी यापूर्वी पावसाळी अधिवेशनात हीच घोषणा विधानपरिषदेत केली होती. त्यावेळी त्यांनी येत्या शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2018-19 पासून प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असेल, अशी घोषणा केली होती.
त्यानंतर आजही त्यांनी त्याबाबतचीच घोषणा केली.
खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने, विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचं तावडे आज म्हणाले.
अनेक विद्यार्थी कॉलेजला अॅडमिशन घेतात, मात्र हजेरी लावत नाहीत. ते खासगी क्लास लावून परीक्षा देतात. अनेकवेळा कॉलेज आणि क्लासचं साटंलोटं असतं. क्लासमुळे विद्यार्थ्यांची कॉलेजला गैरहजेरी असते. ही गैरहजेरी टाळणं तसंच खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी, सातत्याने होत होती. त्याबाबत आता सरकारने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
प्रयोगिक तत्वावर 2015 पासूनच बायोमेट्रिक हजेरी
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि अहमदनगर महापालिका हद्दीतील महाविद्यालयांना 2015 पासूनच ही योजना लागू करण्याचे आदेश दिले होते.
विद्यार्थी नियमितपणे वर्गात न बसणे, अध्यापनाचे काम सरकारी नियमानुसार न होणे, ऑनलाइन अॅडमिशन यादीच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देणे, बोगस पटसंख्या दाखविणे अशा गंभीर बाबी शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement