एक्स्प्लोर
नागपुरात लग्नसमारंभात चोरट्यांचा सुळसुळाट
नागपूरच्या मंगल कार्यालयात लग्नावेळी होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करुन, त्यातील संशयित व्यक्तीची माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहनच केले आहे.
नागपूर : नागपूरच्या मंगल कार्यालयात लग्नावेळी होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करुन, त्यातील संशयित व्यक्तीची माहिती त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहनच केले आहे.
गणेश नगर परिसरातील सांस्कृतिक भवनात लग्न सुरु असताना, वधू पक्षातील काही मंडळी मुलीचे साहित्य तिच्या सासरी पाठविण्याची लगबग करत होते. याचाच फायदा घेत एका चोराने पार्किंगमधील बाईक घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, या चोराने त्याच्या एका सहकाऱ्यासह चोरी करण्याच्या थोड्या वेळ आधी लग्नात यथेच्छ जेवणाचा आस्वाद ही घेतला.
काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. योगिता शिवणकर आणि त्यांच्या मैत्रिणी एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या असताना, त्यांची पर्स चोरीला गेली होती. विशेष म्हणजे, योगिता आपल्या मैत्रिणींसोबत जेवण करत असताना, त्यांची पर्स चोरीला गेली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपुरात लग्न कार्यक्रमात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी परिसरातील काही मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. यातील एक व्हिडीओ सार्वजनिक करुन, संशयित व्यक्तीची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement