एक्स्प्लोर
Advertisement
'केबीसी'त छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बी अमिताभ बच्चन यांचा माफीनामा
शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चनविरोधात टीकेची झोड उठली आहे. तसंच बायकॉट केबीसी, बायकॉट सोनी टीव्ही असे हॅशटॅगही ट्रेंड झाला होता.
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'चा 11 व्या सीजनमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियातून केबीसी आणि सोनी टीव्हीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची मागणी नेटिझन्सकडून केली जात असताना अखेर आपली चूक मान्य करत सोनी टीव्हीने माफी मागत वादावर पडदा टाकला. आता केबीसीचे अॅंकर बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या प्रकरणी माफी मागितली आहे. याआधीच सोनी टीव्ही आणि या कार्यक्रमाचे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी देखील या प्रकरणी माफी मागितली आहे.
केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवराजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठली होती. बुधवारी प्रसारित झालेल्या केबीसीच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात झाला. अनावधानानं प्रेक्षकांच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो असं वाहिनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अनावधानानं जी चूक झाली त्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो, असा माफीचा स्क्रोल येणाऱ्या एपिसोडमध्ये चालवला गेला होता. केबीसी या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. केबीसीमध्ये एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन दिले जातात, यावेळी शिवरायांच्या नावासमोर छत्रपती किंवा महाराज असा उल्लेखही करण्यात आलेला नव्हता, शिवाय अमिताभ बच्चन यांनीही तसा आदरार्थी उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सोशल मीडियावर अमिताभ बच्चनविरोधात टीकेची झोड उठली आहे. तसंच बायकॉट केबीसी, बायकॉट सोनी टीव्ही असे हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. सोनी टीव्हीने जाहीर माफी मागितली होती, मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात मौन बाळगले होते. मात्र अखेर अमिताभ बच्चन यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. अनादर करण्याचा आजिबात हेतू नव्हता, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. 🙏 https://t.co/ynPav4DYfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement