एक्स्प्लोर
भोसरी हत्या आणि आत्महत्या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती उजेडात
भोसरीत पोटच्या तीन मुलांची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे.
पिंपरी चिंचवड : पुण्यातील भोसरी हत्या आणि आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईनेच गळफास दिलेल्या दोन मुलींवर बलात्कार करणारा नराधम दुसरा-तिसरा कोणी नसून त्यांचा बापच आहे. इतकंच नाही तर आरोपीने पत्नीच्या (मुलांची आई) मदतीने तिन्ही मुलांची हत्या केल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, रविवारी संध्याकाळी आरोपी पतीनेच स्वत:च्या मुलींवर बलात्कार केल्याचं समजल्यानंतर पत्नीला धक्का बसला. नंतर पती आणि पत्नीने पोटच्या तिन्ही मुलांना फासावर लटकावलं. आरोपी बाप बाहेर निघून गेला. मग पत्नीने घराला कडी लावून गळफास घेतला. त्यामुळे नेमकं काय घडलं, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
काय आहे प्रकरण?
भोसरीत रविवारी (28 जुलै) तीन मुलांसह आईचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. आईने तिन्ही मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र हत्या केलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचं सोमवारी (29 जुलै) शवविच्छेदन अहवालात उघड झालं. त्यानंतर आज (30 जुलै) मुलींवर बापानेच बलात्कार केल्याचं समोर आलं. शिवाय आरोपी पती-पत्नीने मिळून तिन्ही मुलांना संपवलं आणि मग पत्नीने गळफास घेतला.
सुरुवातीचा अंदाज
सुरुवातीला फळ व्यवसायात नुकसान झाल्याने पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले आणि त्यातून आईने पोटच्या मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. पण सोमवारी हाती आलेल्या शवविच्छेदन अहवालात नऊ आणि सात वर्षीय मुलींवर मृत्यूपूर्वी बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement