धक्कादायक! भिवंडीत वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या, परिसरात एकच खळबळ, गुन्हा दाखल
भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Bhiwandi Crime News : भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करुन दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतावर कामासाठी गेलेल्या महिलेला अज्ञात आरोपीने अत्याचार करून डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ठार मारल्यामुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जसेच्या तसे होते त्यामुळे महिलेची हत्या ही चोरीच्या उद्देशाने नव्हे तर अत्याचार करुन ओळख लपवण्यासाठी वृद्ध महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास मोहीम सुरु केली आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस यंत्रणेकडून आरोपींचा त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी
वयोवृद्ध महिलेवर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबीयांनी शेतावर धाव घेतली. त्यावेळेस वृद्ध महिलाही निपचित पडली होती. कुटुंबीयांनी ही बाब स्थानिक गणेशपुरी पोलिसांना कळविल्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल होते. त्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय या ठिकाणी घेऊन आले. विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हे चोरीला गेले नसल्यामुळं ही हत्या चोरीच्या उद्देशाने नसून त्या महिलेवर अत्याचार करून केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. हत्येच्या घटनेनंतर त्या परिसरातून तीन जणांना पलायन करताना काही जणांनी पाहिल्याचे सांगितल्याची माहिती हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या मुलाने दिली आहे. पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या:
























